वणी बेलखेड येथे भीषण आग; तीन घरे, दोन गोठे, ट्रॅक्टर, गाई खाक, लाखोंचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 07:48 PM2021-12-25T19:48:29+5:302021-12-25T19:52:21+5:30

या घटनेमुळे या तीनही शेतमजुरांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे.

Fierce fire at Wani Belkhed in Amravati; Three houses, two cowsheds, tractor, cow burn | वणी बेलखेड येथे भीषण आग; तीन घरे, दोन गोठे, ट्रॅक्टर, गाई खाक, लाखोंचं नुकसान

प्रतिकात्मक फोटो.

Next

अमरावती: बेलोरा तालुक्यातील वणी (बेलखेड) येथे शनिवारी सकाळी भीषण आग लागली. यात तीन घरे, दोन जनावरांचे गोठे, दोन गाई व एक ट्रॅक्टर जळून खाक झाले. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत सात ते आठ लाखांचे नुकसान झाले असून, तीन कुटुंब उघडल्यावर आली आहेत.

वणी बेलखेडा येथे शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल दोन तास चाललेल्या या अग्नितांडवाने काही क्षणातच उग्ररूप धारण केले. या आगीत अरुण मानकर, मंगला काळे, अब्दुल सत्तार या शेतमजुरांची घरे भक्ष्यस्थानी सापडली. यात घरातील धान्यांसह सर्व संसारोपोयोगी साहित्यांची राख झाली आहे. योगेश अलोणे व गजानन फुले या शेतकऱ्यांचे गोठे जळून खाक झाले आहेत.

या आगीत शेतकरी योगेश अलोणे यांच्या दोन गाई भाजल्या, तर गजानन फुले यांची ट्रॅक्टरसह सर्व शेती अवजारे जळाली आहेत. या घटनेमुळे या तीनही शेतमजुरांचा संसार अक्षरशः उघड्यावर आला आहे. या शेतमजुरांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार नुकसानीचा आकडा ७ ते ८ लाखांच्या घरात असला तरी प्रत्यक्ष पाहणी अहवालानंतर या वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सामूहिक प्रयत्नही पडले थिटे -
आग लागल्याचे लक्षात येताच वणी ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सर्वांनी सामूहिकरीत्या आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. परंतु आगीचे रौद्ररूप पाहता प्रसंगावधान राखून प्रहारचे मंगेश देशमुख यांनी तातडीने चांदूरबाजार येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर आग आटोक्यात आली. महसूलच्या मंडल अधिकारी व तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिली.

आगीची माहिती मिळताच, महसूलच्या प्रतिनिधींनी घटनास्थळ गाठले. तीन कुटुंबांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली. रविवार, २६ डिसेंबरला नुकसानग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल, असे चांदूरबाजारचे तहसीलदार धीरज स्थुल यांनी सांगितले.
 

Web Title: Fierce fire at Wani Belkhed in Amravati; Three houses, two cowsheds, tractor, cow burn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.