पाचवी, आठवीचे वर्ग जोडण्यास स्थगिती ?
By Admin | Published: May 5, 2016 12:28 AM2016-05-05T00:28:28+5:302016-05-05T00:28:28+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या टिसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) रोखून धरल्या आहेत.
शासन निर्णयाची प्रतीक्षा : शिक्षक आमदारांची मंत्र्यांशी चर्चा
अमरावती : स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या टिसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) रोखून धरल्या आहेत. या पार्श्वभूमिवर पाचवी व आठवीचे वर्ग नव्याने जोडण्यास स्थगिती मिळण्याचे संकेत आहेत. अमरावतीचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी याबाबत मंत्र्यांकडे पाठपुरावा चालविला आहे.
राज्यात पूर्वी पहिली ते चौथी प्राथमिक, पहिला ते सातवी पूर्व माध्यमिक, पाच ते दहावी माध्यमिक, आठवीं ते दहावी माध्यमिक, पाचवी ते बारावी माध्यमिक व उच्च माध्यमिक, आठवी ते बारावी माध्यमिक व उच्च माध्यमिक असे स्तर होते. परंतु बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम २००९ (आरटीआई अनुसार) शैक्षणिक स्तर बदलण्यात आला. आता नव्या प्रक्रियेत पहिली ते पाचवी प्राथमिक, दहावी ते आठवी उच्च प्राथमिक, नववी ते दहावी माध्यमिक व अकरावी -बारावीच्या शाळांना उच्च माध्यमिक व अकरावी-बारावींच्या शाळांना उच्च माध्यमिक संबोधल्या जाते. या अनुषंगाने पुणे शिक्षण संचालक यांच्या पत्रानुसार येथे पहिली ते चवथी पर्यंतचे वर्ग आहेत तेथे पाचवा, येथे वर्ग ७ ते ९ किंवा १ ते ७ किंवा ५ ते ७ वींचे वर्ग आहेत. तेथे ८ वा वर्ग जोडण्याचे आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना टिसी रोखून धरल्या. आरटीई २००९ नुसार बालकांचे दाखले रोखता येत नाहीत.
जिल्हा परिषद, नगर पालिका, महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, उपशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी महापालिकेचे शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाचा संदर्भ देवून दाखले देत नसल्याची बाब आ. श्रीकांत देशपांडे यांनी नोंदविली आहे. (प्रतिनिधी)
म्हणून व्हावी प्रक्रिया रद्द
पाचवी आणि आठवीचे नवे वर्ग जोडतांना पुरेशा वर्ग खोल्या व प्रशिक्षित विषय शिक्षक नियुक्त होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या पूर्व माध्यमिक शाळांमध्ये गणित व विज्ञान शिक्षक नाहीत. त्यामुळे वर्ग पाच व आठ जोडण्याची प्रक्रिया रद्द करावी असे निवेदन आ. देशपांडे यांनी दिले आहे. या संदर्भात त्यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे, नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटिल यांच्याशी चर्चा केली आहे. या संबंधीच्या फाईलवर शालेय शिक्षण सचिवांनी अभिप्राय दिला आहे. ना.तावडे राज्यात परतल्यानंतर पाचवी ते आठवींचे वर्ग जोडण्याची प्रक्रिया रद्द करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित होण्याचा आशावाद आ. देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.