अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:27 AM2018-04-03T00:27:15+5:302018-04-03T00:27:15+5:30
अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात पुनर्विचार याचिका शासनामार्फत दाखल करावी, या प्रमुख मागणीसाठी विविध दलित संघटनांतर्फे सोमवारी इर्विन चौक ते जिल्हा कचेरी दरम्यान मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात पुनर्विचार याचिका शासनामार्फत दाखल करावी, या प्रमुख मागणीसाठी विविध दलित संघटनांतर्फे सोमवारी इर्विन चौक ते जिल्हा कचेरी दरम्यान मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यामार्फत शासनाकडे निवेदन पाठविण्यात आले.
अॅट्रासिटी कायद्यात प्रस्तावित बदलांमुळे एससी, एसटी, प्रवर्गावर अन्याय होईल, असे निवेदनात म्हटले आहे. अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर पुनर्विचार याचिका दाखल करावी, याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यातील तज्ज्ञ विधिज्ञाची नियुक्ती करावी, अशी मागणी भीम आर्मीने जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यामार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनात केली. रिपाइं, बसपा, भारिप-बमसं यासह दलित संघटनांनीदेखील जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर केले.
भारत बंदचे जिल्ह्यात पडसाद
आंदोलनात भीम आर्मीचे प्रदेश सचिव मनिष साठे, विदर्भ प्रमुख सचिन पट्टेबहादूर, जिल्हाप्रमुख राजेश वानखडे, अमोल इंगळे,मनोज वानखडे, अनंत इंगळे, बंटी रामटेके, प्रवीण बनसोड, शरद वाकोडे, प्रवीण गजभिये, राहूल भालेराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
चर्मकार महासंघाचीही मागणी
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष नीलेश जामठे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारा केली आहे. यावेळी महासंघाचे विदर्भ सचिव राजेंद्र तांबेकर, श्यामकुमार आकोडे, जगदेव रेवसकर, विजय शेकोकार, युवा जिल्हाध्यक्ष मोहन पटके, रमेश सरोदे व पदाधिकारी उपस्थित होते.
तिवस्यात तहसीलदारांना निवेदन
तिवसा : शहरातील आंबेडकरवादी संघटना, दलित एकता मंच, भारिपच्यावतीने बंद पुकारण्यात आला. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शेकडो आंदोलकांनी पेट्रोल पंप चौकात जमून शासनविरोधात घोषणा दिल्या. बाइक रॅली काढून तिवसा तहसील कार्यालय परिसरात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी नायब तहसीलदार डी.टी. पंधरे यांच्यामार्फत राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. डी.एच. मेश्राम, दिलीप शापामोहन, सतीश यावले, सागर भवते, विनायक भरडे, राजकुमार विघ्ने, ओमप्रकाश वाघमारे, भारत दाहाट, धर्मपाल सोनटक्के, सुरेश मोरघडे, सुरेश मकेश्वर, अरविंद बनसोड, राहुल मनोहर, साहेबराव यावले, दौलतराव सोनटक्केसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत राऊत, तिवसा पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांनी शहरात दंगा नियंत्रण पथकासह तिवसा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केलां होता
नांदगावात कडकडीत बंद
नांदगाव खंडेश्वर : युवा भीम गर्जना संघटनेच्यावतीने नांदगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी गावातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व बाजारपेठ बंद होती. संघटनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष कुंदन मेश्राम, ऋषी गाडगे, सिद्धार्थ मेश्राम, विकी भगत, सागर सोनोने, धम्मपाल गाडगे, प्रज्वल लोहकरे, निकेश घोडेस्वार, सौरभ चौधरी, विकी कावळे, रत्नदीप वरघट, मंगेश सवाई, शेखर तिडके, आकाश हुमने, पप्पू घोडेस्वार, बंटी खडसे, रवि सोनोने, सूरज सोनोने, राजकुमार डोंगरे, आकाश लोहकरे, सूरज अंभोरे, अभिजित वानखडे व युवा भीम गर्जना संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
बडनेरात ठाणेदारांना निवेदन
बडनेरा : अॅट्रॉसिटी अॅक्ट शिथिल करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सोमवार, २ एप्रिल रोजी ठाणेदार गोपाल भारती यांना निवेदन देऊन बडनेरावासीयांनी सहभाग नोंदवला.
शहरातील विविध संघटनांनी एकत्र येऊन नव्यावस्तीतील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते पोलीस स्टेशनपर्यंत शांततेत मार्च काढून ठाणेदार भारती यांना निवेदन दिले.
'भारत बंद'च्या इशाऱ्याने शहरात तगडा बंदोबस्त
'भारत बंद'च्या इशाऱ्यामुळे सोमवारी शहरात आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला होता. विशेषत: व्यापारी प्रतिष्ठानावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले होते. चौकाचौकांत पोलीस यंत्रणा सज्ज होती. भारत बंदला अमरावतीत संमिश्र प्रतिसाद मिळाला.