डम्मा देणाऱ्या आजीविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:10 AM2021-06-06T04:10:34+5:302021-06-06T04:10:34+5:30

चिखलदरा : आजारी नातवाला ताप आल्यामुळे गरम विड्याचे चटके (डम्मा) दिल्याप्रकरणी आजीविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, ...

Filed a case against the grandmother who gave the damma | डम्मा देणाऱ्या आजीविरुद्ध गुन्हा दाखल

डम्मा देणाऱ्या आजीविरुद्ध गुन्हा दाखल

Next

चिखलदरा : आजारी नातवाला ताप आल्यामुळे गरम विड्याचे चटके (डम्मा) दिल्याप्रकरणी आजीविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट अघोरी कृत्यांना प्रतिबंध निर्मूलन व काळी जादू नियम २०१३ चे कलम ३ व भादंविचे कलम ३२४ अंतर्गत शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला.

जासो गोडाम धांडेकर (६५, रा. खटकाली) असे आरोपी आजीचे नाव आहे. सलोना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. केशव कंकाल (५२) यांनी याबाबत तक्रार नोंदविली. टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या खटकाली गावात तीन वर्षीय राजरत्न जामूनकर या चिमुकल्याला ताप आल्याने धामणगाव गढी येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. ताप न उतरल्याने त्याच्या पोटावर गरम विड्याचे चटके दिले गेले. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली. सदर माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात त्याला उपचारार्थ दाखल केले. तेथून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात गरम विळ्याचे चटके देणाऱ्या आजीविरुद्ध चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बॉक्स

अघोरी डम्मा प्रथेचा केव्हा होणार नायनाट?

मेळघाटातील आदिवासींमध्ये अंधश्रद्धा आहे. कुठल्याही शुभ-अशुभ कार्यासाठी ते भूमकाकडे जातात. दुसरीकडे डोक्यापासून पायापर्यंत होणाऱ्या वेदनांवर डम्मा हाच उपचार असल्याची मान्यता आहे. चुलीतील विस्तवावर गरम विळा तापवून लहानांपासून तर मोठ्यापर्यंत दुखण्यावर चटके दिले जातात. अशा प्रकरणांंमध्ये संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहे. प्रशासन व काही सामाजिक संघटना यांनी आदिवासींमध्ये जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र, जिवावर बेतणारा अघोरी प्रकार सुरूच असल्याचे वास्तव आहे.

कोट

नातवाला गरम विळ्याचे चटके देणाऱ्या आजीविरुद्ध डॉक्टरच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- राहुल वाढिवे, ठाणेदार, चिखलदरा

Web Title: Filed a case against the grandmother who gave the damma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.