फसवणुकीचाही गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:18 PM2018-06-26T22:18:43+5:302018-06-26T22:19:40+5:30

अंधश्रद्धेचा फायदा घेत भोळ्या भाबड्या भाविकांकडून पैसे उकळणाऱ्या पवन घोंगडे महाराजविरुद्ध आता गाडगेनगर पोलिसांनी फसवणुकीचाही गुन्हा नोंदविला आहे. पवन महाराज मोकाट असून तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून त्याचा कसून शोध सुरू आहे.

Filing a complaint for cheating | फसवणुकीचाही गुन्हा दाखल

फसवणुकीचाही गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देतांत्रिक पद्धतीने शोध सुरू पिशवी भरून साहित्य नेणारी ‘ती’ महिला मोकाटच

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंधश्रद्धेचा फायदा घेत भोळ्या भाबड्या भाविकांकडून पैसे उकळणाऱ्या पवन घोंगडे महाराजविरुद्ध आता गाडगेनगर पोलिसांनी फसवणुकीचाही गुन्हा नोंदविला आहे. पवन महाराज मोकाट असून तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून त्याचा कसून शोध सुरू आहे.
पवन महाराजच्या आई-वडिलांना गाडगेनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर पवन महाराजाच्या घरी एक तरुणी गेली होती. तिने पवन महाराजाच्या घरातून दोन पिशव्या भरून साहित्य नेल्याचे तेथील रहिवाशांनी प्रत्यक्ष पाहिले. तिने काही आक्षेपार्ह साहित्य नेल्याची चर्चा आहे.
तंत्रविद्येतून नागरिकांची दिशाभूल
या घटनेला आठ दिवस ओलांडून गेलेत, मात्र, अद्यापपर्यंत पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केलेली नाही. पोलिसांनी त्या महिलेला ठाण्यात बोलाविले. मात्र, ती हजर झाली नाही. पवन महाराज अंगात देवी येण्याचे सोंग करून तंत्रविद्येच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करीत होता. अंधश्रद्धाळू भक्तांना अंगारा देत, त्यांचे दु:ख निवारण्याचा आव आणत होता. या मोबदल्यात तो भक्तांकडून पैसे किंवा साहित्य घेत होता. ही एकाप्रकारे शुध्द फसवणूकच आहे. शनिवार, मंगळवार, पौर्णिमा, अमावशा व नवरात्रीत पवन महाराज अंगात देवी येण्याचे सोंग करून भक्तांच्या समस्या व आजार दूर करण्यासाठी अंगारा, नारळ किंवा अन्य साहित्य देऊन शुद्ध फसवणूकच करायचा. ही बाब लक्षात घेता गाडगेनगर पोलिसांनी पवन महाराजाविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात भादंविच्या कलम ४२०(फसवणूक)ची वाढ केली आहे.
पवन महाराजची पंढरपूर वारी
पवन महाराजाच्या आई-वडिलांना अटक झाल्यानंतर तो मुंबई किंवा नाशिकला गेल्याचेही ऐकीवात आले. दोन दिवसांपूर्वी पवन महाराज जामगाव किंवा रहाटगावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, तो मिळाला नाही. पवनच्या आई-वडिलांच्या बयाणानुसार, पवन हा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीला गेला आहे. पवनजवळ मोबाईल नाही. त्यामुळे त्याचे लोकेशन ट्रेस करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे पवनजवळील चारजणांचे मोबाईल क्रमांकांच्या आधारे पोलीस शोधत आहे.

पवन महाराज मोबाईल वापरत नसल्यामुळे त्याचे लोकेशन ट्रेस करणे अवघड झाले आहे. मात्र, तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून पवनचे शोधकार्य सुरू आहे.
- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

Web Title: Filing a complaint for cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.