अमरावतीत ईव्हीएम दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:44 PM2018-08-12T22:44:59+5:302018-08-12T22:45:18+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. बंगळुरुहून ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) शुक्रवारी अमरावतीत दाखल झाल्यात. त्या मशिन्स विलासनगरातील तीन शासकीय गोदामांमध्ये व जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बॅडमिंटन हॉलमध्ये पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आल्यात. तेथे २४ तास पोलीस पहारा देत असून, सीसीटीव्हीचाही वॉच राहणार आहे.

Filing of EVM in Amravati | अमरावतीत ईव्हीएम दाखल

अमरावतीत ईव्हीएम दाखल

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीची तयारी : यंत्रणा लागली कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. बंगळुरुहून ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) शुक्रवारी अमरावतीत दाखल झाल्यात. त्या मशिन्स विलासनगरातील तीन शासकीय गोदामांमध्ये व जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बॅडमिंटन हॉलमध्ये पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आल्यात. तेथे २४ तास पोलीस पहारा देत असून, सीसीटीव्हीचाही वॉच राहणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच बंगळुरुवरून पाच कंटेनर ट्रकमध्ये ईव्हीएम यंत्र निघाले. शुक्रवारी ते शहरात दाखल झाले. यात ५६६७ बीयू ( बॅलेट युनिट) व ३२९५ कंट्रोल युनिट आहेत. बंगळुरुच्या भारत इलेक्ट्रॉनिक लि. (बेल) मधून सदर ईव्हीएम येथे दाखल झाल्यात. त्या मशिन्स ठेवण्यासाठी चार गोदामांची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी शिल्लक असला तरी आतापासून यंत्रणा कामाला लागली आहे. भातकुलीचे एसडीओ विनोद शिरभाते यांच्या मार्गदर्शनात त्या मशिनी आणल्या. यावेळी नायब तहसीलदार संजय मुरतकर, सतीश घारड, मनोज शिरभाते उपजिल्हाधिकारी शरद पाटील, सतीश पेशने उपस्थित होते.
दोन आठवड्यात व्हीव्ही पॅट दाखल होणार
मतदान करताना व्होटर व्हेरीफिएबल पेपर आॅडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) चा वापर करण्यात येणार आहे. ते यंत्र ईव्हीएमला जोडले जातील. मतदाराने कुणाला किंवा कुठल्या पक्षाला मतदान केले. ते बॅलेट युनिटच्या स्क्रीनवर काही सेकंदासाठी दिसेल व नंतर त्याची प्रिंट व्हीव्ही पॅट यंत्रात जाईल. यामुळे निवडणूक पारदर्शक होणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक व्हीव्हीपॅट लावले जातील. यामध्ये १४०० प्रिंंटची क्षमता आहे.

Web Title: Filing of EVM in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.