अखेर ७७ सहायक वनसंरक्षकांना विभागीय वनाधिकारीपदी पदोन्नती
By गणेश वासनिक | Published: July 13, 2023 07:12 PM2023-07-13T19:12:46+5:302023-07-13T19:13:00+5:30
महसूल विभाग झाले वाटप, गडचिरोली नक्षलग्रस्त भागाचा बॅकलॉग भरून निघणार
गणेश वासनिक, अमरावती : राज्याच्या वनविभागाने गत वर्षभरापासून रिक्त असलेल्या ७७ विभागीय वनअधिकारीपदी सहायक वनसंरक्षकांना पदोन्नती बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागात रिक्त असलेल्या विभागीय वनअधिकारी पदांचा बॅकलॉग भरून निघणार आहे. विशेषत: गडचिरोली नक्षलग्रस्त भागात नव्याने डीसीएफ मिळणार आहे.
‘लोकमत’ने ७ जुलै २०२३ रोजी ‘वनाधिकाऱ्यांची ७७ पदे रिक्त’ या आशयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत राज्याच्या महसूल व वनविभागाचे अवर सचिव आनंदा शेडगे यांच्या स्वाक्षरी १२ जुलै २०२३ रोजी सहायक वनसंरक्षक गड- अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गातून विभागीय वन अधिकारी गट- अ (वरिष्ठ श्रेणी) संवर्गात पदोन्नती देण्याबाबत आदेश जारी केला आहे.
असे झालेत वन अधिकाऱ्यांना महसूल विभाग वाटप
नागपूर : ३१
औरंगाबाद : १०
पुणे : ११
अमरावती : १०
नाशिक : ०९
कोकण : ०६