अखेर न प च्या सफाई कामगारांना मिळाली संरक्षक किट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:51+5:302021-05-28T04:10:51+5:30
अंजनगाव सुर्जी : नगरसेविकेच्या पत्रव्यवहारानंतर येथील सफाई कामगारांना संरक्षक किट मिळाली. शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना कंत्राटदाराकडून एक ...
अंजनगाव सुर्जी : नगरसेविकेच्या पत्रव्यवहारानंतर येथील सफाई कामगारांना संरक्षक किट मिळाली. शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना कंत्राटदाराकडून एक वर्षांपासून तोंडाला मास्क, हातमोजे, बूट, सॅनिटायझर व इतरही कोणतेही संरक्षण साहित्य उपलब्ध करून न दिल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले होते.
नगरसेविका सुनीता मुरकुटे यांनी त्वरित दाखल घेऊन सदरचे कंत्राटी सफाई कामगारांना दोन दिवसांत संरक्षक किट उपलब्ध करून देण्याचे लेखी पत्राद्वारे सूचित केले होते. अन्यथा मुख्याधिकारी यांच्या दालनात आंदोलनाची भूमिका जाहीर केली होती. मुख्याधिकारी सुमेध अलोने यांनी त्वरित दखल घेऊन दुसऱ्याच दिवशी सफाई कामगारांना कंत्राटदारामार्फत संरक्षक किट उपलब्ध करून दिली. त्यामुळे सध्या तरी कामगारांचा प्रश्न मिटला.