-अखेर तो डांबर प्लांट हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 06:00 AM2020-02-07T06:00:00+5:302020-02-07T06:00:43+5:30

परतवाडा-अकोला मार्गावर सिमेंट प्लांटच्या उभारणीनंतर परतवाडा -चिखलदरा मार्गावरील धामणगाव गढीनजीक रस्त्याच्या कामासाठी डांबर प्लांट सुरू करण्यासंदर्भात सावळी दातुरा ग्रामपंचायतीने ना-हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्याविरोधात ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया हरिगोविंदनगर व शांती वाटिका येथील रहिवाशांनी डांबर प्लांटला विरोध दर्शविला होता.

-Finally it shoots the asphalt plant | -अखेर तो डांबर प्लांट हटणार

-अखेर तो डांबर प्लांट हटणार

Next
ठळक मुद्देलढा : एनए रद्द करण्यासंदर्भात एसडीओंनी बजावली नोटीस

परतवाडा : अकोला अंजनगाव मार्गावर सुरू करण्यात येणाऱ्या डांबर प्लांटला तात्काळ हटविण्याचे आदेश अचलपूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीला बजावले आहे. त्याठिकाणचे एनए रद्द करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली असून, ११ फेब्रुवारी रोजी संबंधित जागामालकाला उपस्थित राहण्याचे आदेश एसडीओंकडून देण्यात आले.
परतवाडा-अकोला मार्गावर सिमेंट प्लांटच्या उभारणीनंतर परतवाडा -चिखलदरा मार्गावरील धामणगाव गढीनजीक रस्त्याच्या कामासाठी डांबर प्लांट सुरू करण्यासंदर्भात सावळी दातुरा ग्रामपंचायतीने ना-हरकत प्रमाणपत्र दिले होते. त्याविरोधात ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया हरिगोविंदनगर व शांती वाटिका येथील रहिवाशांनी डांबर प्लांटला विरोध दर्शविला होता. त्यासंदर्भात त्यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, प्रदूषण महामंडळ जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते. प्लांट न हटविल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला होता. 'लोकमत'ने हा मुद्दा जनदरबारात रेटून धरला.
यासंदर्भात गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी अचलपूर उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी एका आदेशान्वये गट क्रमांक ४३/३ क्षेत्र १.५ हेक्टर जमिनीवर निर्माण होणारा डांबर प्लांट हटविण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायत वगळता कुठल्याच विभागाची परवानगी घेतली नसल्याचे नायब तहसीलदारांच्या चौकशी अहवालात आढळून आल्याचे पत्रात नमूद आहे. प्रदूषण टाळण्यासाठी व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी सदर निर्णय घेण्यात आला असून, जमीनमालक दुर्गाशंकर अग्रवाल व जांडू कंस्ट्रक्शन कंपनीच्या व्यवस्थापकाला नोटीस बजावलीे.
शांतीवाटिका, हरिगोविंदनगर वासींसह आदिवासी पर्यावरण संघटना आदींनी सदर मुद्दा रेटून धरला होता. यासंदर्भात निवेदन व तक्रारी करूनही दखल न घेतल्याने आंदोलनाचा इशारा दिला पर्यावरण संघटनेचे योगेश खानजोडे, संजय डोंगरे, सुरेश प्रजापति, राजेश मुंडे, गजानन रेवस्कर, प्रकाश आदींनी दिला आहे.

जमीनमालकाला नोटीस
सदर जागेचा अकृषक आदेश रद्द का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस जमीनमालक अग्रवाल यांना बजावण्यात आली. त्यासंदर्भात त्यांना ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता म्हणणे मांडण्यासाठी सर्व दस्तऐवज घेऊन हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

स्थानिकांच्या तक्रारीवरून नायब तहसीलदारांनी चौकशी केली. त्यामध्ये डांबर प्लांटसाठी आवश्यक परवानगी नव्हती. त्यामुळे प्लांट रद्द करण्याचे आदेश दिले. एनए रद्द का करण्यात येऊ नये, यासंदर्भात जमीन मालकाला नोटीस बजावली.
- संदीपकुमार अपार,
उपविभागीय अधिकारी अचलपूर

Web Title: -Finally it shoots the asphalt plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.