-अखेर रुक्मिणीनगरातील 'त्या' दारूविक्रेत्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 05:00 AM2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:01:20+5:30

‘लोकमत’ने ९ ऑगस्ट रोजी स्टिंग ऑपरेशन केले. ‘दुपारी चहा, रात्री दारु’ या मथळ्याखाली पुराव्यांनिशी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पोलिसांनी अवैध दारु विक्रेत्याची शोधमोहीम राबविली. रुक्मिणीनगरातील करण बियर शॉपीलगत पोलिसांनी नियोजितपणे कारवाई करुन अवैध दारु विक्रेत्याला रंगेहात पकडले. महाराष्ट्र दारुबंदी विक्री कायद्यांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

-Finally, the liquor dealer from Rukmini Nagar was arrested | -अखेर रुक्मिणीनगरातील 'त्या' दारूविक्रेत्याला अटक

-अखेर रुक्मिणीनगरातील 'त्या' दारूविक्रेत्याला अटक

Next
ठळक मुद्देराजापेठ पोलिसांची कारवाई : मुद्देमालासह दुचाकीही जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रुक्मिणीनगरात मुख्य रस्त्यालगत एका व्यावसायिक संकुलाच्या आवारात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीप्रकरणी पोलिसांनी छापा घालून अखेर ‘त्या’ दारूविक्रेत्याला अटक केली. राजीव शिवदास हिरोळे (५२, रा. जुना सातुर्णा, अमरावती), असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई राजापेठ पोलिसांनी केली.
‘लोकमत’ने ९ ऑगस्ट रोजी स्टिंग ऑपरेशन केले. ‘दुपारी चहा, रात्री दारु’ या मथळ्याखाली पुराव्यांनिशी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पोलिसांनी अवैध दारु विक्रेत्याची शोधमोहीम राबविली. रुक्मिणीनगरातील करण बियर शॉपीलगत पोलिसांनी नियोजितपणे कारवाई करुन अवैध दारु विक्रेत्याला रंगेहात पकडले. महाराष्ट्र दारुबंदी विक्री कायद्यांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

३,३४० रुपयांची दारू जप्त
यात आरोपीजवळून ३,३४० रूपयांची दारु आणि एक मोटरसायकल ताब्यात घेतली. हे घटनास्थळ फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत येत असताना राजापेठ पोलिसांनी ही कारवाई केली. अवैध दारू विक्रीला राजापेठ ठाण्याचे रंगनाथ जाधव, फिरोज खान, छोटेलाल यादव, राजेश गुरेले, दिनेश भिसे यांनी केली.

अवैध दारु विक्रीस्थळी दररोज पेट्रोलिंग सुरु आहे. ९ ऑगस्ट रोजी एकास अटक करण्यात आली आहे. येथे नियमित पोलिसांची पाळत आहे. काही अडचण असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क करावा.
- किशोर सूर्यवंशी, ठाणेदार, राजापेठ.

Web Title: -Finally, the liquor dealer from Rukmini Nagar was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.