अखेर अध्यक्षांनी सोडला लाल दिव्याचा मोह

By Admin | Published: May 6, 2017 12:06 AM2017-05-06T00:06:18+5:302017-05-06T00:06:18+5:30

केंद्र सरकारच्या आदेशानंतर महापौर व अनेक बड्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शासकीय वाहनांवरील लाल दिवे काढले होते.

Finally, the President gave up the illusion of red light | अखेर अध्यक्षांनी सोडला लाल दिव्याचा मोह

अखेर अध्यक्षांनी सोडला लाल दिव्याचा मोह

googlenewsNext

जिल्हा परिषद : आदेश धडकताच निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र सरकारच्या आदेशानंतर महापौर व अनेक बड्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शासकीय वाहनांवरील लाल दिवे काढले होते. मात्र, झेडपी अध्यक्षांच्या शासकीय वाहनावरील लाल दिवा ४ मे पर्यंत कायम होता. त्यामुळे त्यांच्या वाहनावरील लालबत्तीबाबत आश्चर्य व्यक्त होत होते. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाचे आदेश प्राप्त झाल्याचे निदर्शनास आणून देताच अध्यक्षांच्या दिमतीला असलेल्या शासकीय वाहनावरील दिवा शुक्रवारी काढण्यात आला.
देशातील ‘व्हीआयपी कल्चर’ बंद करण्यासाठी लाल दिव्यांची दिवाळी बंद करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. त्याची तातडीने अंमलबजावणी करीत मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी त्यांच्या वाहनांवरील दिवे त्वरित हटविले. यामध्ये महापौरांच्या वाहनाचा समावेश होता. परंतु झेडपी अध्यक्षांच्या वाहनावरील दिवा मात्र कायम असल्याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्याने जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आणि अध्यक्षांनी शुक्रवारी लाल दिव्याचा मोह सोडला. लालदिव्याच्या वाहनातून प्रवास करणारे सामान्य जनांना कमी लेखायचे. त्यामुळे केंद्र शासनाने सर्वसमावेशक भारत या उद्देशाने हा निर्णय घेतला असून याला देशभरातून समर्थनदेखील होत आहे. जि.प. अध्यक्षांनीसुद्धा शुक्रवारी लाल दिवा काढला, हे विशेष.

Web Title: Finally, the President gave up the illusion of red light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.