अखेर वनबल भवनातून आरएफओंच्या बदल्यांची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:13 AM2021-09-03T04:13:57+5:302021-09-03T04:13:57+5:30

कॉमन (सीडी/ प्रादेशिक) अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या (आरएफओ) बदल्यांचे अधिकार नागपूर येथील वनबल भवनाकडे ...

Finally the process of transfer of RFOs from Vanbal Bhavan | अखेर वनबल भवनातून आरएफओंच्या बदल्यांची प्रक्रिया

अखेर वनबल भवनातून आरएफओंच्या बदल्यांची प्रक्रिया

Next

कॉमन (सीडी/ प्रादेशिक)

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यातील वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या (आरएफओ) बदल्यांचे अधिकार नागपूर येथील वनबल भवनाकडे बहाल करण्यात आले होते. त्यानुसार वनबल भवनातून ३० ऑगस्ट रोजी ४७ आरएफओंना विशेष कारणास्तव आंतरवृत्तीय विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. या नव्या निर्णयाने वन मंत्रालयातील आर्थिक व्यवहाराला ब्रेक लागला असून, बदली झालेल्या आरएफओंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.

विनंती बदल्यांमध्ये संतोष कुरोडे (पुसद, यवतमाळ), शीतल कर्णासे (नागपूर, कळमेश्वर), जयेश तायडे (नागपूर, पवनी), शीतल घुटे (अमरावती, मोर्शी), निशिकांत कापगते (नागपूर, कोंढाळी), चेतन पाटील (सांगली, तासगाव), राजेश पंचभाई (बल्लारशाह, आलापल्ली), गौरी नेवारे (भंडारा, गडेगाव), विद्या अवधुतराव, (लातूर, उदगीर), अक्षय आगाशे (वर्धा, हिंगणी), विशाल सालकर (ब्रम्हपुरी, सिंदेवाही), सुशील मंतावार (पुणे, शिरोता), योगेश शेरेकर (आलापल्ली), मोहन शेळके (अहमदनगर, कर्जत), संदीप जोपळे (कोल्हापूर, हेळवाक), अमृत दगडे (कोल्हापूर, मलकापूर), शिशुपाल पवार (कोल्हापूर, कराड), नंदकुमार भोसले (कोल्हापूर, चंदनगड), मोहन ताम्हणे (सोलापूर, सांगोला), अशोक वाडे (कोल्हापूर, कडगाव), सचिन जाधव (सांगली, शिराळा), सोनल ढोेले (सांगली, ईस्लामपूर), वैष्णवी जरे (कोल्हापूर, सागरेश्वर), स्नेहा राऊत (पुणे, जुन्नर), प्रतीक मोडवान (नांदेड, भोकर), रीता वैद्य (ठाणे, डहाणू), गजय लांबाडे (अमरावती, चांदूर बाजार), तुषार गायकवाड (कोल्हापूर, पन्हाळा), शंकर तागडे (नागपूर, गोरेवाडा प्रकल्प), महेश पाटील (सातारा, खंडाळा), शीतल नगराळे (जळगाव, चाळीसगाव), वंदना विधाते (यवतमाळ, राळेगाव), श्यामकांत देसले (जळगाव, पारोळा), प्रकाश सावळे (बुलडाणा, मेहकर), उमेश जंगम (अलिबाग, माथेरान), सुशांत काळे (अमरावती, जारीदा), उल्हास चव्हाण (बीड, पटोदा), किशोर आत्राम (वर्धा, आष्टी), कोमल गजरे (नागपूर, दक्षिण उमरेड), सुहास माेरे (वाशिम, मालेगाव), विनोद बेलवाडकर (सिंधुदुर्ग, कणकवली), रघुनाथ कांबळे (सोलापूर, माेहळ), लक्ष्मीकांत ठाकरे (वडसा, बेडगाव), भाऊसाहेब जवरे (पुणे, भीमाशंकर-२), रविकमल भगत (गोंदिया), प्रियंका वेलमे (चंद्रपूर, चिचपल्ली), सुहास पाटील (कोल्हापूर, राधानगरी) असे एकूण ४७ आरएफओंना पदस्थापना देण्यात आल्याचे आदेश अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन) विकास गुप्ता यांनी निर्गमित केले आहे. बदलीच्या ठिकाणी आरएफओंना रुजू होणे क्रमप्राप्त आहे. कोणताही दबाव आणून बदली रद्द होणार नाही, ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.

Web Title: Finally the process of transfer of RFOs from Vanbal Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.