...अखेर मंत्र्यांचे 'पीए' ठरले, कामाला मिळणार गती; १६ मंत्र्यांना अजूनही प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 11:04 IST2025-01-22T11:03:11+5:302025-01-22T11:04:24+5:30

कोण कुणाचे पीए : केवळ चार राज्यमंत्र्यांना पीए

...Finally, the ministers' 'PA' has been decided, work will get momentum; 16 ministers are still waiting | ...अखेर मंत्र्यांचे 'पीए' ठरले, कामाला मिळणार गती; १६ मंत्र्यांना अजूनही प्रतीक्षा

...Finally, the ministers' 'PA' has been decided, work will get momentum; 16 ministers are still waiting

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
राज्य मंत्रिमंडळाचे गठन झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने कामकाजास गती मिळाली असून, मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी त्यांचे स्वीय सहायक (पीए) निवडले आहेत, तर १६ मंत्र्यांना अद्यापही उत्तम 'पीए'चा शोध आहे.


मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी कामाचा धडाका सुरू केला असताना त्यांचे सहकारी मात्र आवडीतील 'पीए'च्या शोधात होते. अखेर हा शोध संपला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १७ जानेवारी रोजी मंत्र्यांसाठी 'पीए' आणि विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. शासनाच्या कार्यालयीन आस्थापनेवर असलेल्या वर्ग १ व वर्ग २ च्या अधिकाऱ्यांना आता मंत्र्यांच्या सेवेत 'ऑन ड्युटी' तैनात करण्यात आले आहे. असे असले तरी स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी असल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र वित्त विभागाच्या मान्यतेसह द्यावे लागणार आहे.


केवळ चार राज्यमंत्र्यांना पीए 
राज्यमंत्री म्हणून सहा आमदारांनी शपथ घेतली. त्यातील केवळ चार राज्यमंत्र्यांना पीए मिळाले आहे. यात पंकज भोयर, मेधना बोर्डीकर, इंद्रनील नाईक, माधुरी मिसाळ यांचे भाग्य उजळले. योगेश कदम आणि आशिष जयस्वाल हे अद्याप पीएविना आहेत


१६ मंत्र्यांना प्रतीक्षा 
मंत्री संजय राठोड, नीलेशराणे, उदय सामंत, गिरीश महाजन, गुलाबराब पाटील, गणेश नाईक, दादाजी भुसे, जयकुमार रावल, अतुल सावे, शंभुराज देसाई, आशिष शेलार, आदिती तटकरे, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, आकाश पुंडकर, प्रकाश आबिटकर या १६ मंत्र्यांना पीएचा शोथ असणार आहे.


कोण कुणाचे पीए 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे: जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे, उपमुख्यमंत्री अजित पवार: पशुधन विकास अधिकारी डॉ. अमर भडंगे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे : अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींमी, तहसीलदार प्रशांत पाटील व कक्ष अधिकारी राहुल गांगुर्डे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपायुक्त जयदीप पवार, नायब तहसीलदार डॉ. गौरी शंकर चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ : अवर सचिव नंदकुमार आंदळकर, उपमुख्य कार्यकारी भूपेंद्र बेडसे.

Web Title: ...Finally, the ministers' 'PA' has been decided, work will get momentum; 16 ministers are still waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.