अखेर तालुका आरोग्य अधिकारी यांचे स्थानांतरण.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:50+5:302021-06-19T04:09:50+5:30
येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव इंगळे यांनी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात रुजू व्हावे व त्यांच्या जागी धामक येथील ...
येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव इंगळे यांनी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात रुजू व्हावे व त्यांच्या जागी धामक येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजरत्न मनवर यांच्याकडे पदभार द्यावा असा आदेश जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पारित केला आहे. येथील शिवसेनेचे सुरेश राजगुरे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या विरोधात वरिष्ठाकडे ७ जूनला तक्रारी दाखल केल्या होत्या.
यापूर्वीही पंचायत समितीच्या मासिक सभेत दोन महिन्यापूर्वी त्यांच्या बदलीचा ठराव घेण्यात आला होता. तसेच माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन तालुका आरोग्य अधिकारी इंगळे यांचे लसीकरण कडे अक्षम्य दुर्लक्ष, वारंवार सुट्टी वर जाणे, नियोजनाचा अभाव इत्यादी बाबी बाबीमुळे तालुका कोरोना लसीकरणात माघारला असल्याने त्यांच्या बडतर्फीची मागणी केली होती.
अशातच नवजात बालकाच्या लसीकरणा संदर्भात विचारणा करण्यासाठी येथील शिवसेनेचे सुरेश राजगुरे हे तालुका आरोग्य अधिकारी यांना भेटले असता त्यांनाही उडवाउडवीची उत्तरे दिली. या बाबत राजगुरे यांनी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य संचालक, उपसंचालक यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. अखेर डॉ. इंगळे यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश येऊन येथे धडकले असले तरी बदली ही प्रशासकीय कारवाई नव्हे तर त्यांचे निलंबन करावे अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्यक्ष भेट घेऊन राजगुरे केली आहे.