अखेर विद्यापीठाचे ‘सेमिस्टर पॅटर्न’ निकालास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:25 AM2018-08-22T01:25:13+5:302018-08-22T01:25:43+5:30

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात काही कारणास्तव रखडलेल्या सेमिस्टर पॅटर्न परीक्षेच्या निकालात गती आली आहे. आतापर्यंत ७० हजार विद्यार्थ्यांचे बिनचूक निकाल जाहीर करण्यात आले असून, आठवडाभरात सर्वच निकाल लागतील, असा कृतिआराखडा तयार केला आहे.

Finally, the University's 'Semester Pattern' eliminates the speed | अखेर विद्यापीठाचे ‘सेमिस्टर पॅटर्न’ निकालास गती

अखेर विद्यापीठाचे ‘सेमिस्टर पॅटर्न’ निकालास गती

Next
ठळक मुद्देमहाविद्यालयांची कानउघाडणी : ७० हजार विद्यार्थ्यांचे बिनचूक निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावतीविद्यापीठात काही कारणास्तव रखडलेल्या सेमिस्टर पॅटर्न परीक्षेच्या निकालात गती आली आहे. आतापर्यंत ७० हजार विद्यार्थ्यांचे बिनचूक निकाल जाहीर करण्यात आले असून, आठवडाभरात सर्वच निकाल लागतील, असा कृतिआराखडा तयार केला आहे.
‘लोकमत’ने १४ आॅगस्ट रोजी ‘अमरावती विद्यापीठ निकालात मुंबई विद्यापीठाच्या वाटेवर’ या आशयाचे वृत्त प्रकाशित करून विद्यार्थ्यांच्या समस्या लोकदरबारात मांडल्या होत्या. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सेमिस्टर पॅटर्न निकाल जाहीर करण्यात येण्याऱ्या अडचणी, समस्यांवर मंथन केले. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, परीक्षा विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी निकाल जाहीर करण्यात येणाºया तांत्रिक बाबी पडताळल्या. काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्याचे गुण फार्मेटमध्ये भरून पाठविण्यास विलंब लावला असताना अशा महाविद्यालयांची विद्यापीठाने कानउघाडणी देखील केली. दरम्यान सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचे निकाल ९० टक्के जाहीर करण्यात आले आहे. ७० हजार विद्यार्थ्यांचे बिनचूक निकाल लावण्यात विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. आॅगस्टअखेर होम एक्झामचे सर्वच निकाल जाहीर केले जातील, असा कृतिआराखडा परीक्षा विभागाने तयार केला आहे.
असे झाले निकाल जाहीर
सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचे आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालानुसार बीए भाग- १ च्या १७१ महाविद्यालयांचे १२६ जाहीर, तर ३० निकाल प्रक्रियेत आहेत. बीए. भाग- २ च्या १८१ महाविद्यालयांचे १६७ निकाल जाहीर झाले असून, १४ निकाल प्रक्रियेत आहे. बी.कॉम भाग- १ च्या ११७ महाविद्यालयांचे १०५ निकाल जाहीर झाले तर ८ निकाल त्वरेने लागतील. बी.कॉम. भाग- २ च्या १२६ महाविद्यालयांचे ११५ निकाल जाहीर झाले असून, २ निकाल प्रक्रियेत आहेत. बी.एससी. भाग- १ च्या १०१ महाविद्यालयांचे ९२ निकाल जाहीर झाले आहे. बी.एससी भाग- २ च्या १०२ महाविद्यालयांचे ९६ निकाल जाहीर झाले आहे. एकूण ७० हजार विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात आले आहे.

सेमिस्टर पॅटर्न परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात विलंब लागला हे वास्तव आहे. हा पहिला प्रयोग असल्याने यात काही तांत्रिक त्रृट्या सुधारून नव्याने बदल केले जातील. ७० हजार विद्यार्थ्यांचे बिनचूक निकाल जाहीर केले, हीदेखील जमेची बाजू आहे.
- राजेश जयपूरकर,
प्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती

Web Title: Finally, the University's 'Semester Pattern' eliminates the speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.