अखेर चांदूर रेल्वे अमरावती मार्गाच्या कामाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:46+5:302021-07-10T04:10:46+5:30

शिवसेनेचे दिले होते निवेदन चांदूर रेल्वे : चांदूर रेल्वे - अमरावती मार्गावरील रस्त्याच्या साईड पाटल्या भरण्यास अखेर सुरुवात झाली ...

Finally work on Chandur Railway Amravati route started | अखेर चांदूर रेल्वे अमरावती मार्गाच्या कामाला सुरूवात

अखेर चांदूर रेल्वे अमरावती मार्गाच्या कामाला सुरूवात

Next

शिवसेनेचे दिले होते निवेदन

चांदूर रेल्वे : चांदूर रेल्वे - अमरावती मार्गावरील रस्त्याच्या साईड पाटल्या भरण्यास अखेर सुरुवात झाली असून सदर काम शुक्रवारीसुध्दा सुरू होते. साईट पाटल्या भरण्याबाबतचे निवेदन शिवसेनेतर्फे चांदूर रेल्वे शहरप्रमुख स्वप्निल मानकर यांच्या नेतृत्वात अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.

अमरावती - चांदूर रेल्वे - धामणगाव रेल्वे हा रस्ता हायब्रिड अ‍ॅन्युटी प्रकल्पांतर्गत झाला आहे. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाची देखभाल करण्याची जबाबदारी आहे. रस्ता पूर्ण झाला तरीही त्या रस्त्याच्या बाजूच्या असलेल्या साईड शोल्डर (साईड पाटल्या) कुठेही भरलेल्या नव्हत्या. किंबहुना तिथे कुठल्याही प्रकारचे मटेरियल टाकलेले नव्हते व या रस्त्याची जाडी ही साईट पाटल्यापासून जास्त असल्यामुळे बरेच अपघात होत होते. त्यामुळे साईड शोल्डर (साईड पाटल्या)चे काम पूर्ण करण्यात यावे जेणेकरून अपघात टाळता येईल, अशी मागणी शिवसेनेने अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देऊन केली होती. अखेर या रस्त्याच्या साईट पाटल्या भरण्याचे काम सुरू झाले आहे.

(बॉक्समध्ये घेणे)

माजी आमदारांचेही प्रयत्न

माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनीसुध्दा साईट पाटल्या भरण्याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना भेटून चर्चा केली होती. सदर कामाला परवानगी देण्याबाबत आदेश देण्याची मागणी केली होती. यानंतर सदर कामाला आदेश मिळून आता कामाला प्रारंभ झाला आहे.

090721\img-20210709-wa0014.jpg

photo

Web Title: Finally work on Chandur Railway Amravati route started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.