वित्तविभागाचे कामकाज ठप्प
By admin | Published: March 18, 2017 12:19 AM2017-03-18T00:19:45+5:302017-03-18T00:19:45+5:30
जिल्हापरिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली लेखा कर्मचाऱ्यांनी शुक्रवार तिसऱ्या दिवशीही लेखणीबंद आंदोलन सुरूच ठेवले होते.
जिल्हा परिषद : लेखणीबंद आंदोलन, कोट्यवधींचा व्यवहार थांबला
अमरावती : जिल्हापरिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली लेखा कर्मचाऱ्यांनी शुक्रवार तिसऱ्या दिवशीही लेखणीबंद आंदोलन सुरूच ठेवले होते. जिल्हापरिषदेसह जिल्ह्यातील १४ पंचायत समितींमधील लेखा विभागासह इतर विभागातील वित्तीय कामे पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिणामी कुठलेही आर्थिक व्यवहार होत नसल्याने ऐन मार्च महिन्यातच वित्त विभागाची कोंडी झाली आहे.
लेखा कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करावे जिल्हा सेवा वर्ग ३ श्रेणी १ मध्ये असलेले पद सहायक लेखाधिकारी यांना राजपत्रित दर्जा मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी लेखणीबंद आंदोलन सुरू आहे. यावेळी मनीष पंचगाम, मनीष गिरी, अनुप सोलीव, सतीश मावळे, प्रज्वल घोम आदींची उपस्थिती होती.
अध्यक्ष, उपाध्यक्षांना निवेदन
तीन दिवसांपासून झेडपी लेखा कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे ऐन मार्चमध्ये आर्थिक व्यवहार कोलमडले आहे. शासनाने यावर तोडगा काढावा, अशी मागणी लेखा कर्मचाऱ्यांनी अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांना निवेदन दिले.
ही कामे झाली प्रभावित
शासकीय अनुदाने खोळंबली
विकासात्मक कामांवर खर्च होईना
कुठल्याही कामाचा धनादेश काढला जात नाही
शासकीय अनुदाने व त्यावर होणारा खर्च थांबला
खर्चाची बिले थांबली आहेत.