चांदूरबाजारमध्ये पॅसेंजरच्या खोळंब्याची कारणे शोधणार

By admin | Published: May 29, 2014 11:31 PM2014-05-29T23:31:36+5:302014-05-29T23:31:36+5:30

जलद रेल्वे गाड्यांना मोर्शी येथे थांबा मिळावा, या मागणीची पूर्तता करणे आपल्या हाती नाही; मात्र चांदूरबाजार येथे पॅसेंजर एक तासपर्यंत खोळंबून राहते. यासंदर्भात आवश्यक ते नियोजन करता येऊ शकेल,

Find out the reason for the passenger's escape in Chandurbar market | चांदूरबाजारमध्ये पॅसेंजरच्या खोळंब्याची कारणे शोधणार

चांदूरबाजारमध्ये पॅसेंजरच्या खोळंब्याची कारणे शोधणार

Next

मोर्शी : जलद रेल्वे गाड्यांना मोर्शी येथे थांबा मिळावा, या मागणीची पूर्तता करणे आपल्या हाती नाही; मात्र चांदूरबाजार येथे पॅसेंजर एक तासपर्यंत खोळंबून राहते. यासंदर्भात आवश्यक ते नियोजन करता येऊ शकेल, असे नागपूरचे विभागीय रेल्वे प्रबंधक ओमप्रकाश सिंग यांनी सांगितले.
विभागीय रेल्वे प्रबंधक ओमप्रकाश सिंग येथील रेल्वे स्थानकाच्या निरीक्षणाकरिता आले असता स्थानिक विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन अमरावती-नरखेड मार्गावर सुरु असलेल्या दोन साप्ताहिक रेल्वे गाड्यांना मोर्शीला थांबा मिळावा, रेल्वे स्थानकावर संगणकीकृत तिकिटांची आणि आरक्षणाची सोय उपलब्ध करुन द्यावी, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण वलगावपर्यंत झाले असून कामाला गती देऊन नरखेडपर्यंत विद्युतीकरण व्हावे, रेल्वे स्थानकावर थंड पाण्याची सोय व्हावी, याशिवाय अमरावतीकडे जाणारी पॅसेंजर चांदूरबाजारला जवळपास एक तासपर्यंत थांबविली जाते. पर्यायाने अमरावती, अकोल्याकडे जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होते, प्रवासी रेल्वेने जाण्याऐवजी बसने प्रवास करतात, त्यामुळे रेल्वेचे नुकसान होत असल्याची बाब यावेळी किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष देवीदास कापसे, ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय उल्हे, वाहतूकदार रामदास कापसे, कापड विक्रेता संघाचे मिलिंद ढोले इत्यादींनी रेल्वे प्रबंधकांच्या नजरेस आणून दिली.
विभागीय रेल्वे प्रबंधक ओमप्रकाश सिंग यांनी प्रतिनिधी मंडळाशी चर्चा करताना एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न हा थेट रेल्वे मंत्रालयाशी निगडित असल्याचे विशद केले. रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाकरिता जेवढा निधी उपलब्ध होता त्यातून वलगावपर्यंंत विद्युतीकरण झाले. पुढे निधी उपलब्ध होताच विद्युतीकरणाच्या कामाला गती देण्यात येईल, विद्युतीकरणानंतर संगणकीय प्रणाली सुरु करता येईल, असे त्यांनी विशद केले. चांदूरबाजार येथे एक तासापर्यंत पॅसेंजर का थांबविण्यात येते? यासंदर्भात उपस्थित  अधिकार्‍यांशी त्यांनी चर्चा करुन या प्रश्नाची सोडवणूक करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात विभागीय रेल्वे प्रबंधक ओमप्रकाश सिंग हे मोर्शीला आले होते. त्यावेळीसुद्धा विविध संघटनांनी त्यांना या मागण्यांचे निवेदन दिले होते. (तालुका प्रतिनिधी)
 

Web Title: Find out the reason for the passenger's escape in Chandurbar market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.