बच्चू कडूंनी घेतली कार्यालयांची झडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:59 PM2018-05-07T22:59:36+5:302018-05-07T22:59:36+5:30

आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता ३ शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या. यावेळी अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित आढळले. हजेरी पुस्तक कोरे आढळल्याने आ. बच्चू कडू यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून त्या कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे सुचविले.

Find out the work done by Kadu | बच्चू कडूंनी घेतली कार्यालयांची झडती

बच्चू कडूंनी घेतली कार्यालयांची झडती

Next
ठळक मुद्देलेटलतीफ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याच्या सूचना : अधिकारी, कर्मचाºयांचे अप-डाऊन

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता ३ शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या. यावेळी अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित आढळले. हजेरी पुस्तक कोरे आढळल्याने आ. बच्चू कडू यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून त्या कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे सुचविले.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र, शासनाचा पगार व घरभाडे भत्ता घेऊनही अधिकारी बाहेरून ये-जा करतात. याचा फटका ग्रामीण भागातून येणाºया नागरिकांना सोसावा लागतो. तालुक्यातील अधिकाºयांच्या खुबुगिरीमुळे तेथील कर्मचाºयावर वचक राहिलेला नाही.
सोमवारी सकाळी १०.४५ वाजता आ. बच्चू कडू यांनी दुय्यम निबंधक कार्यालयास भेट दिली. तेथील ५ पैकी ३ कर्मचारी अनुपस्थिती होते. या कार्यालयात कर्मचाºयांच्या हालचाली रजिस्टरवर कोणत्याच नोंदी नव्हत्या. आ. कडू यांनी प्रभारी दुय्यम निबंधक जी.एम. लाहोडे यांची कानउघाडणी केली. यानंतर त्यांचा ताफा सहा. निबंधक कार्यालयाकडे वळला.
कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे
आ. बच्चू कडू यांची शासकीय कार्यालयांना दिलेल्या आकस्मिक भेटीमुळे अनेक कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पितळ उघडे पडले. तालुक्यातील शासकीय कार्यालयांत अधिकाऱ्यांचा पुन्हा भोंगळ कारभार आढळल्यास प्रहारस्टाईल हिसका दाखवणार, अशी प्रतिक्रिया आ. बच्चू कडू यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली.
'त्या' रजिस्टरचा वापर कशासाठी?
सकाळी ११ ते ११.१५ वाजेपर्यंत अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित असल्याचे बघून आ. बच्चू कडू संतापले. त्यांनी सहायक निबंधक राजेश भुयार यांना दूरध्वनीवर याबाबत विचारणा केली. सहायक निंबंधक अनुपस्थित असल्याबाबतचे कारण व कमृचाºयांचीही रजिस्टवर नोंदी नसल्याने हे रजिस्टर कशासाठी, असा सवाल तालुका कृषी अधिकारी दीक्षित यांना केला

Web Title: Find out the work done by Kadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.