‘तो’ पत्नीच्या फोटोवर करायचा फायरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 10:04 PM2017-09-27T22:04:51+5:302017-09-27T22:05:03+5:30

पत्नीच्या मृत्यूचा आरोप आईवर लागल्याने द्वेष भावनेतून तो मृत पत्नीच्या फोटोवर देशी कट्ट्याने फायरिंग करायचा. चार महिन्यांपूर्वी घडलेला हा प्रकार गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आला.

'Finger' on his wife's photo | ‘तो’ पत्नीच्या फोटोवर करायचा फायरिंग

‘तो’ पत्नीच्या फोटोवर करायचा फायरिंग

Next
ठळक मुद्देआरोपीकडून देशी कट्टा जप्त : केवल कॉलनीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पत्नीच्या मृत्यूचा आरोप आईवर लागल्याने द्वेष भावनेतून तो मृत पत्नीच्या फोटोवर देशी कट्ट्याने फायरिंग करायचा. चार महिन्यांपूर्वी घडलेला हा प्रकार गाडगेनगर पोलिसांच्या निदर्शनास आला. मंगळवारी पोलिसांनी संजय वसंत दळवी (३५,रा.शेगाव, अमरावती) याला देशी कट्टा विक्री करण्याच्या बेतात असताना अटक केली आणि त्याच्याजवळील देशी कट्टा जप्त केला आहे.
शेगाव परिसरातील रहिवासी संजय दळवी केवल कॉलनीत नागरिकांना देशी कट्टा विक्री करीत असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनात एएसआय अरुण कोडापे, पोलीस शिपाई अहमद अली, विक्की नशिबकर, प्रशांत वानखडे यांचे पथक केवल कॉलनीत पोहोचले. दरम्यान पोलिसांनी संजय दळवीची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेत देशी कट्टा खोचलेला आढळून आला. पोलिसांनी संजय दळवीला अटक करून देशी कट्टा जप्त केला. त्याच्याविरुध्द ३, ७ आर्मअ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला. विशेष म्हणजे, संजय दळवी याने चार महिन्यांपूर्वी घरात फायरिंग केल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळाली होती. वर्षभरापूर्वी संजय दळवीची पत्नी जळून मृत्यू पावली. तीच्या मृत्युला कारणीभुत असल्याचा आरोप संजयच्या आईवर लागला होता. तेव्हापासून संजयच्या मानसिकतेवर आघात झाला. तो घरातील भिंतीवर पत्नीचा फोटो लावून फोटोवर फायरिंग करीत असल्याचे काही नागरिकांना दिसले होते. ही माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संजयच्या घराची पाहणी केली. तेव्हा भिंतीवर काही निशाण आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: 'Finger' on his wife's photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.