फिनले मिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:17 AM2021-08-24T04:17:18+5:302021-08-24T04:17:18+5:30
प्रबंधकांचा वरिष्ठांना ई-मेल मिलच्या प्रबंधकानी वरिष्ठांकडे ई-मेलद्वारे एक पत्र पाठवून सुरू असलेले आंदोलन व कामगारांच्या मागण्या याविषयी माहिती दिली. ...
प्रबंधकांचा वरिष्ठांना ई-मेल
मिलच्या प्रबंधकानी वरिष्ठांकडे ई-मेलद्वारे एक पत्र पाठवून सुरू असलेले आंदोलन व कामगारांच्या मागण्या याविषयी माहिती दिली. यावर सकारात्मक आदेश मिळावे, ही अपेक्षाही त्यांनी पत्रात केली. पण, सायंकाळी ४ वाजेपर्यंत कुठलेही सकारात्मक उत्तर एनटीसीकडून प्राप्त झाले नव्हते. यादरम्यान वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याशीही कामगारांच्यावतीने काहींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आंदोलनाची आणि कामगारांच्या मागण्यांची माहितीसुद्धा पोहचविली गेली.
--------------------
ना. गडकरी यांची शिफारस
यापूर्वी वेतनसाठी कामगारांनी १११ दिवस उपोषण केले होते. गेटसमोर मुंडणही केले. तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी फिनले मिल सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले होते. पण, कोरोनाच्या लाटेमुळे हा आदेश मागे पडला. यानंतर ५ जुलैला नितीन गडकरी यांनी फिनले मिल सुरू करावी, या अनुषंगाने ना. गोयल यांना पत्र पाठविले.
----------------
पंचवीस कोटींपेक्षा अधिक नफ्यात असलेली मिल बंद ठेवून गरीब कामगारांची उपासमार केली जात आहे. ती तात्काळ मिल सुरू करावी व अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रमाणे कामगारांना पूर्ण वेतन द्यावे, या मागणीसाठी आपण तीनशे फूट उंचावर चढून आंदोलन करीत आहे.
- अभय माथने, अध्यक्ष, गिरणी कामगार संघ व आंदोलन बॉक्स
--------------
तुषार भारतीय व श्रीकांत भारतीय हे बंधू वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या मंत्रालयाशी सतत संपर्क साधून आहेत. पीयूष गोयल यांच्याकडून काही सकारात्मक संदेश येईल, याची आम्ही व कामगार वाट बघत आहोत.
- गजानन कोल्हे, भाजप नेते