20 चमकोबाजांवर एफआयआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:04 PM2019-03-05T22:04:36+5:302019-03-05T22:04:41+5:30
महापालिका क्षेत्रात लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डि$ंग, फ्लेक्समुळे शहरातील चौकांचे विद्रुपीकरण झाले आहे.
तक्रारी दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महापालिका क्षेत्रात लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डि$ंग, फ्लेक्समुळे शहरातील चौकांचे विद्रुपीकरण झाले आहे. ‘लोकमत’द्वारे याचा जनदरबारात जागर करण्यात आला. अखेर बाजार व परवाना विभागाला जाग येऊन श्हरातील विविध ठाण्यांमध्ये मंगळवारी सकाळपासून सहायक आयुक्त व संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे २० हून अधिक चमकोबाजांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्यात. उशिरापर्यत ही प्रक्रिया सुरूच होती. ‘लोकमत’ने यासंबंधाने लोकदरबारात मुद्दा उचलून धरला होता.
पाच दिवसात २५२ अनधिकृत होर्डिंग जप्त
महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाद्वारे यंदा जानेवारी महिन्यात ६० अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाई केली. त्यानंतर हा विभाग सुस्त होता. मात्र, ‘लोकमत’द्वारे याविषयीचा जागर केल्यानंतर या विभागाला जाग आली व २८ फेब्रुवारीला ११०, १ मार्चला ३२, २ मार्चला ७०, तर ४ मार्चला ४० अनधिकृत होर्डिंग जप्त करण्यात आले. गाडगेनगर ठाण्यात १० व राजापेठ ठाण्यात १० राजकीय पदाधिकाऱ्यांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.