आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संजय कदमविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:31 PM2018-08-03T22:31:50+5:302018-08-03T22:33:16+5:30
मराठा आरक्षणाची मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाºया संजय महादेव कदम (रा. वडाळी, देवीनगर) याच्याविरुद्ध गुरुवारी सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मराठा आरक्षणाची मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करणाºया संजय महादेव कदम (रा. वडाळी, देवीनगर) याच्याविरुद्ध गुरुवारी सायंकाळी गुन्हा नोंदविण्यात आला.
राज्यभरात मराठा आरक्षणाच्या मागणीची धग कायम असताना, त्याचे पडसाद विविध ठिकाणी उमटत आहेत. गुरुवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास संजय महादेव कदम नामक व्यक्ती अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोहोचली. त्याने मराठा आरक्षणावर तारीख पे तारीख मिळत असल्याची ओरड केली. काकासाहेब शिंदे या मराठ्याने आरक्षणासाठी आत्महत्या केली. मीदेखील आत्महत्या करणार आहे, असे म्हणून संजय कदमने बिसलरी बॉटलमध्ये आणलेले रॉकेल अंगावर ओतले. हा प्रकार तेथे उपस्थित असणाºया पोलिसांना दिसताच त्यांनी तात्काळ संजय कदमला ताब्यात घेतले. याप्रकरणात गाडगेनगर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी हेमंत वाकोडे यांनी तक्रार नोंदविली असून, संजय कदमविरुद्ध भादंविच्या कलम ३०९ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
डीसीआरमध्ये घटनास्थळ बदलविले
संजय कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब अनेकांनी बघितली. मात्र, गाडगेनगर पोलिसांनी पोलीस नियंत्रण कक्षाला दिलेल्या माहितीत घटनास्थळ बियाणी चौक दाखविण्यात आले. ही चूक आहे की मुद्दाम करण्यात आले, ही बाब संभ्रम निर्माण करणारी ठरते. माध्यमांना दररोज प्राप्त होणाºया डेली क्राइम रिपोर्टमध्ये ही बाब निदर्शनास आली असून, या घटनेविषयी तपास अधिकारी संतोष तोकलवाड दाखविण्यात आले आहे. मात्र, त्यांना याविषयी काही माहिती नसल्याचे आढळून आले.