बडनेरा स्थानकाच्या भोजनालयात आग

By admin | Published: November 2, 2016 12:23 AM2016-11-02T00:23:15+5:302016-11-02T00:23:15+5:30

बडनेरा रेल्वे स्थानकावरील एका भोजनालयाला सोमवारच्या रात्री अचानक आग लागल्याने रेल्वे स्थानक परिसरात एकच तारांबळ उडाली.

Fire in Badnera Restaurant | बडनेरा स्थानकाच्या भोजनालयात आग

बडनेरा स्थानकाच्या भोजनालयात आग

Next

रेल्वे गाड्या धावल्या उशिरा : प्रवाशांची तारांबळ, अनर्थ टळला
बडनेरा : बडनेरा रेल्वे स्थानकावरील एका भोजनालयाला सोमवारच्या रात्री अचानक आग लागल्याने रेल्वे स्थानक परिसरात एकच तारांबळ उडाली. सुदैवाने आगीवर लवकरच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे बऱ्याच प्रवासी गाड्या उशिराने धावल्यात. दुरंतो एक्सप्रेस तब्बल तीन तास आऊटरवर थांबून होती.
सोमवारच्या रात्री १०.४५ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावरील वृंदावन नामक भोजनालयात अचानक आग लागली. रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना भोजनालयातील आगीचा भडका उडाल्याचे दिसून आल्यावर आग विझविण्याचा प्रयत्न सुरु झाला. बडनेरा शहरातच फटाका मार्केटजवळ उभी असलेली अग्निशामकची गाडी तत्काळ घटनास्थळी पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत भोजनालयातील लाकडी छत जळाले. भोजनालयात ४ ते ५ सिलिंडर होते. या सिलेंडरचा भडका झाला असता तर मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते. रेल्वेच्या विद्युत विभागाने टाकळी ते टीमटाळा पर्यंतचा रेल्वेचा विद्युत पुरवठा बंद केला होता. ही आग कशामुळे लागली, याची चौकशी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी करीत आहे. ज्या भोजनालयात आग लागली त्याचे नूतनीकरण केले जात आहे. वायरिंगचेदेखील काम सुरू आहे. या कामात कुठला हलगर्र्र्र्जीपणा झाला काय हेदेखील तपासला जात आहे.
चार तास रेल्वेचा विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे प्रवासी गाड्या उशीराने धावण्यात दुरंतो एक्सप्रेस तब्बल तीन तास आउटवर थांबून होती. अमरावती- उदणा, सेवाग्राम एक्सप्रेस, माळदा, पॅसेंजर या गाड्या उशिराने धावल्यामुळे प्रवाशांना बऱ्याचवेळ पर्यंत ताटकळत राहावे लागले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तीन अग्निशमन बंबांचा वापर करावा लागला. रेल्वेचे वाणिज्य निरीक्षक व्ही.डी. कुंभारे, स्टेशन मास्टर अनेकर, मुख्य टी.सी. वकील खान, विद्युत अभियंता किशोर लोहबरे, पोलिस निरीक्षक डी.एम. पाटील, रेल्वे सुरक्षा रस्ताचे पटेल यासह अग्निशामक बळाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी प्रयत्नरत होते. आगीमुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली होती. (प्रतिनिधी)

बडनेऱ्यातील बंब
आला कामात
गेल्या दोन महिन्यांपूर्वीचे महानगरपालिकेत बडनेऱ्यात कायमस्वरुपी अग्निशमन बलाचा एक बंब झोन कार्यालयाच्या आवारात २४ तास ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा पाण्याचा बंब शहरातील फटाका मार्केटजवळच उभा होता. तत्क्षण तो बंब घटनास्थळी पोहोचल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, अन्यथा रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली असती.

Web Title: Fire in Badnera Restaurant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.