अग्निशमन दलात ना अत्याधुनिक साधने, ना पुरेसे मनुष्यबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:12 AM2020-12-25T04:12:18+5:302020-12-25T04:12:18+5:30
अमरावती महापालिका क्षेत्राच्या २५ किमी परिघातील नागरिकांच्या संरक्षणार्थ वालकट कंपाऊंड, एमआयडीसी, ट्रान्सपोर्टनगर, बडनेरा या ठिकाणाहून शहरातील कानाकोपऱ्या लागणाऱ्या आगीवर ...
अमरावती महापालिका क्षेत्राच्या २५ किमी परिघातील नागरिकांच्या संरक्षणार्थ वालकट कंपाऊंड, एमआयडीसी, ट्रान्सपोर्टनगर, बडनेरा या ठिकाणाहून शहरातील कानाकोपऱ्या लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य अग्निशमन विभाग करीत आहे. मात्र, सद्यस्थितीत शहरात पाच ते सहा मजली इमारत बांधकामाला परवानगी दिली जात असून, अशा इमारतींत आगीची घटना घडल्यास त्यावर प्रभावी उपाययोजनेच्या दृष्टीने टीटीएल (फायर फायटर) साधने येथे उपलब्ध तर नाहीच, शिवाय वॉटर टेंडर वाहनांची संख्या तोकडी असल्याने जुन्याच यंत्रणांच्या भरवशावर काम चालविले जात आहे.
बॉक्स
कर्मचाऱ्यांचा अभाव
चारही विभागात नियमित कर्मचाऱ्यांची संख्या ५२ आहे. त्यातील पाच कर्मचारी येत्या काही दिवसांत निवृत्त होणार आहेत. कंत्राटी २५ फायरमॅन व १५ चालक अशा ९२ कर्मचारी साडेआठ लाख नागरिकांच्या आगीपासून संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत. शहराच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ३० टक्के लोकसंख्येसाठी तैनात कर्मचाऱ्यांची ही संख्या मानली जात आहे.
५९ आगीच्या घटना
शहरात जानेवारी ते डिसेंबर २०२० दरम्यान आगीच्या ५९ घटना घडल्यात. पैकी जयस्तंभ चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावरील एका दुमजली इमारत कोसळून दोन चौकीदार मलब्याखाली दबल्याची घटना संस्मरणात राहण्याजोगी ठरली. जवानांना किमान नऊ तास सातत्या कर्तव्य बजावून त्यांना बाहेर काढावे लागले. रेस्क्यू पथकातील सहा कर्मचारी यात गुंतले होते.
कोट
शहरातील वाढत्या बांधकामाच्या तुलनेत आपल्याकडील साधने तोकडी ठरत आहे. यासंदर्भात वरिष्ठांना कळविले आहे. मनुष्यबळाचाही अभाव आहे. मात्र, स्थिती पाहून अडजेस्टमेंट करावी लागत आहे.
- अजय पंधरे, अधीक्षक, अग्रिनशमन विभाग.