जवाहर रोडवरील कापड प्रतिष्ठानाला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:06 PM2018-07-24T22:06:39+5:302018-07-24T22:07:06+5:30
जवाहर रोड स्थित सारथी मेन्सवेअरच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे महागडे कपडे व साहित्य जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या चार बंबांचा मारा केल्यानंतर तासाभरानंतर आग नियंत्रणात आली. या भीषण आगीमुळे व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जवाहर रोड स्थित सारथी मेन्सवेअरच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे महागडे कपडे व साहित्य जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या चार बंबांचा मारा केल्यानंतर तासाभरानंतर आग नियंत्रणात आली. या भीषण आगीमुळे व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.
जवाहर रोडवर सर्वाधिक व्यापारी प्रतिष्ठाने असून, ती सर्व एकमेकांना खेटून आहेत. मंगळवारी सकाळी सारथी मेन्सवेअरच्या दुसºया माळ्यावरून अचानक आगीचे लोळ बाहेर पडताना तेथील चौकीदार रतनसिंह लोहार यांना दिसले. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला देऊन तात्काळ मालक महेश टेकचंद पिंजाणी यांना कळविले. घटनेच्या माहितीवरून काही वेळातच अग्निशमनचे अधीक्षक भरतसिंग चव्हाण, फायरमन सैयद अन्वर यांच्यासह पथकाने पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळ गाठले. त्यावेळी सारथी मेन्सवेअरच्या दुसºया मजल्यावर आगीचे भीषण स्वरूप दृष्टीस पडले. त्यांनी तात्काळ आगीवर पाण्याचा मारा करून नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर तासाभरानंतर आग नियंत्रणात आली. मात्र, या घटनेमुळे जवाहर मार्गावरील व्यापाºयांची चांगलीच तारांबळ उडाली होती. आगीवर लवकरच नियंत्रण मिळविण्यात आल्याने मोठी हानी टळली. तरीसुद्धा या आगीत सारथी मेन्सवेअरमधील महागडे कडपे व अन्य साहित्य जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकानमालकाने वर्तविला आहे.