अमरावतीत शिवाजी कॉम्प्लेक्सला आग; ४५० विद्यार्थ्यांना सुखरुप काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 03:06 PM2022-04-08T15:06:38+5:302022-04-08T15:38:49+5:30
अमरावतीतील शिवाजी कॉम्प्लेक्सला शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत अडकलेल्या बन्सल कोचींग क्लासेसच्या सुमारे ४५० विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
अमरावती : मध्यवर्ती बस स्थानक मार्गावरील शिवाजी कॉम्प्लेक्सला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. यावेळी आगीत अडकलेल्या बन्सल कोचींग क्लासेसच्या सुमारे ४५० विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
माहितीनुसार, अमरावतीतील शिवाजी कॉम्प्लेक्समध्ये दुपारी १ च्या समुरास अचानक आग लागली. आगीचे धूर निघू लागताच एकच गोंधळ माजला. या कॉम्प्लेक्समध्ये बन्सल कोचिंग क्लासेस असून येथे जेईई-नेट च्या तयारीसाठी विद्यार्थी येत असतात. आग लागली तेव्हा या कॉम्प्लेक्समध्ये जवळ ४५० विद्यार्थी होते.
आग लागल्याची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन विभागाचे ५ बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणली. यी घटनेत लता नामक इंडस्ट्रिज पूर्णत: आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याची माहिती आहे. घटनास्थळी पाेलीस आणि महापालिका अग्निशमन पथक तैनात आहेत. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी घटना होता-होता टळली.