जिल्हा परिषदेत शार्ट सर्कीटमुळे आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:41+5:302021-07-17T04:11:41+5:30
५० हजारांचे नुकसान; सतर्कतेमुळे मोठी हानी टळली अमरावती : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य ...
५० हजारांचे नुकसान; सतर्कतेमुळे मोठी हानी टळली
अमरावती : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनालगत असलेल्या मार्गात शुक्रवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास अचानकच इन्व्हर्टर बॅटरी फुटून शाॅर्ट सर्कीट झाल्यामुळे आग लागल्याची घटना उघडकीस आली.
जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त सीईओंचे दालनापासून सामान्य प्रशासन विभागाकडे जाणाऱ्या मार्गावर वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्थेसाठी प्रशासनाने इन्व्हर्टर बॅटरी बसविल्या आहेत. मात्र, १६ जुलै रोजी सकाळच्या सुमारास यातील बॅटरी फुटल्याने शार्ट सर्कीट झाले. त्यामुळे एमसीबी, मेन स्विच, लायमेटर आणि पीपीओ केलेले साहित्य जळून खाक झाले. यात जिल्हा परिषदेचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार चौकीदार भीमराव तायडे यांच्या निदर्शनास येतात यांनी तातडीने याची माहिती जिल्हा परिषदेचे वायरमन नंदू मेहरे यांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.