हॉटेलमधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग; गुदमरल्याने केबल नेटवर्क अधिकार्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:27 AM2021-09-02T04:27:26+5:302021-09-02T04:27:26+5:30

फोटो पी ३१ हॉटेल व ठक्कर अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यासमोरील हॉटेल इम्पेरियामधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग लागल्यानंतर ऑक्सिजनअभावी एकाचा ...

Fire to electric panel in hotel; Cable network officer dies of suffocation | हॉटेलमधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग; गुदमरल्याने केबल नेटवर्क अधिकार्याचा मृत्यू

हॉटेलमधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग; गुदमरल्याने केबल नेटवर्क अधिकार्याचा मृत्यू

Next

फोटो पी ३१ हॉटेल व ठक्कर

अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यासमोरील हॉटेल इम्पेरियामधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग लागल्यानंतर ऑक्सिजनअभावी एकाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ३ च्या सुमारास घडली. दिलिप चंद्रकांत ठक्कर (५४, रा. जमुना क्रमांक ३, सीए रोड, नागपूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताचे जावई चेतन तेली (४०, एकनाथपुरम) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी हॉटेल संचालक रितेश लुल्ला (३२. रामपुरी कॅम्प) याच्याविरूद्ध भादंविचे कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेने हॉटेलमधील एकंदरितच सुरक्षाव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. राजापेठ पोलीस ठाण्यासमोर इम्पेरिया नामक चार माळ्याचे हॉटेल व लॉज आहे. तेथील तिसर्या मजल्यावर १३ खोल्या असून, त्यासमोरच इलेक्ट्रिक पॅनेल आहे. त्या पॅनेनला रात्री २ नंतर शार्ट सर्किटने आग लागली. ती आग धुमसत असतानाच धुराचा प्रचंड लोळ उठला. तो धूर निघून जाण्यासाठी त्या माळ्यावर पुरेशी जागा नसल्याने तो धूर खोल्यांमध्ये शिरला. त्या अंधार्या खोल्यांमध्ये देखील व्हेंटिलेशन नव्हते. धुराचे लोळ उठल्याने पळापळ झाली. त्यातच पुरेसा प्राणवायू न मिळाल्याने दिलिप ठक्कर यांचा गुदमरून मृत्यू झाला.

//////////

२०२ मध्ये मिळाला मृतदेह

जीटीपीएल या केबल नेटवर्कचे विदर्भ व्यवस्थापक असलेले ठक्कर हे खोली क्रमांक २०५ मध्ये थांबलेले होते. तर त्यांचे पुण्याचे सहकारी दिपेश शहा हे बाजुच्या खोलीत होते. माहितीनुसार, पळापळ झाली तेव्हा, ठक्कर खोलीतून बाहेर पडले. मात्र, पॅसेजमध्ये अंधार व धूर साचल्याने ते बाहेर पडू शकले नाही. त्यांचा मृतदेह खोली क्रमांक २०२ मध्ये आढळून आला.

//////////

‘टिम राजापेठ’मुळे ‘ते’ पाच जण सुखरूप

हाॅटेलच्या सहा रूममध्ये सहा ग्राहक होते. पैकी दुबे, शेलार, पाटील, चौरसिया व शहा या पाच जणांना राजापेठ पोलिसांनी सहिसलामत बाहेर काढले. ठाणेदार मनीष ठाकरे व त्यांची टिम लागलीच घटनास्थळी पोहोचली. पीएसआय कृष्णा मापारी, कर्मचारी दुलाराम देवकर, अमोल खंडेझोड, राहुल ढे॑गेकर, नीलेश पोकळे, अतुल स॑भे, दानिश शेख, प्रशांत गिरडे, ढवळे यांनी प्राणाची बाजी लावत त्यांना हॉटेलबाहेर काढले.

///////

ना इमरजंसी एक्झिट ना फायर ऑडिट

हॉटेलमध्ये इमरजंसी एक्झिट नसल्याने ग्राहकाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. धूर असल्याने चिंचोळ्या जागेतून बाहेर जाणारा मार्ग त्याच भागात आग लागल्याने अवरूद्ध झाला. त्यामुळे ठक्कर यांना बाहेरच पडता आले नाही. या हॉटेलचे फायर ऑडिट झाले नसल्याचे देखील पोलिसांंना चौकशीदरम्यान सांगण्यात आले.

Web Title: Fire to electric panel in hotel; Cable network officer dies of suffocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.