अग्निशमन विभागालगत चालतो जुगार
By admin | Published: March 28, 2016 12:06 AM2016-03-28T00:06:58+5:302016-03-28T00:06:58+5:30
अग्निशमन विभागाच्या बाजूला खुल्या जागेत राजरोसपणे जुगार खेळ सुरू असतो
नागरिक संतप्त : गाडगेनगर पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष
संदीप मानकर अमरावती
अग्निशमन विभागाच्या बाजूला खुल्या जागेत राजरोसपणे जुगार खेळ सुरू असतो.त्यामुळे काय करतात गाडगेनगर पोलीस, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
येथे एक बार आहे. त्यासमोर खुली जागा आहे. या जागेत १० ते १५ युवक एकत्र येऊन राजरोसपणे जुगार खेळताना निदर्शनास येत आहे. मात्र अनेक दिवसांपासून याकडे गाडगे नगर पोलिसांचे दुर्लक्ष आहे. मात्र येथील सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज सुरु आहे. येथे बाहेरच्या लोकांची नेहमीच वर्दळ असते. खुलआम जुगार खेळणे कायद्याने गुन्हा आहे. पोलिसांनी जुगऱ्यांना धाड टाकून पकडणे अपेक्षित आहे. मात्र पोलीस का कारवाई करीत नाही, हा प्रशन आहे. खुलेआम जुगार खेळला जात असल्यामुळे परिसरातील युवक याला बळी पडतात व तेसुद्धा अवैधरीत्या जुगार खेळतात. त्यामुळे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. असा जुगाराचा अड्डा पोलिसांनी ुुउधवस्त करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
मी माहिती घेतो. अशाप्रकारचा जुगार खेळत असतील तर धाड टाकून कारवाई करण्यात येईल.
- के.एम. पुंडकर,
पोलीस निरीक्षक, गाडगेनगर