तिवसा तालुक्यातील चार गावांना आगीचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 01:44 AM2019-05-09T01:44:17+5:302019-05-09T01:44:38+5:30

धुरा पेटविल्याने भडकलेल्या आगीने बुधवारी अडीच किलोमीटरचा प्रवास करीत वणी, ममदापूर, सुलतानपूर, नमस्कारी या चार गावांना वेढा घातला होता. आगीमुळे दोन संत्राबागा जळून खाक झाल्या, शिवाय गावांना धोका निर्माण झाला होता.

Fire at four villages in Tivasa taluka | तिवसा तालुक्यातील चार गावांना आगीचा वेढा

तिवसा तालुक्यातील चार गावांना आगीचा वेढा

Next
ठळक मुद्देअडीच किलोमीटरवरील परिसर खाक : सहा तासांनंतर आग नियंत्रणात

लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : धुरा पेटविल्याने भडकलेल्या आगीने बुधवारी अडीच किलोमीटरचा प्रवास करीत वणी, ममदापूर, सुलतानपूर, नमस्कारी या चार गावांना वेढा घातला होता. आगीमुळे दोन संत्राबागा जळून खाक झाल्या, शिवाय गावांना धोका निर्माण झाला होता. अग्निशमन जवान व नागरिकांनी शर्थ करून आग विझविली. आ. यशोमती ठाकूर यांनी स्वत: नागरिकांना आग विझविण्यासाठी सहकार्य केले.
वणी गावालगत अज्ञात इसमाने शेताच्या बांधावर आग लावली होती. बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास आगीमुळे रवींद्र टेकाडे व राजेंद्र टेकाडे यांच्या संत्राबागा जळून खाक झाल्या. आग एवढी भीषण होती की, बघता बघता जंगलापासून अडीच किलोमीटर परिसर जळाल्यानंतर गावापर्यंत ती पसरत आली होती. घटनेची माहिती मिळताच पाच अग्निशामक बंबांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच खुद्द आमदार यशोमती ठाकूर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनीही आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले. सहा तासांनंतर आग नियंत्रणात आली. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार दत्ता पंढरे, पोलीस निरीक्षक अजय आकरे, पीएसआय आशिष बोरकरसह पोलीस, महसूल व महावितरणचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले होते.
लोकप्रतिनिधींनीही घेतले परिश्रम
आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह भाजप नेत्या निवेदित चौधरी, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख विलास माहुरे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित बोके, तिवसा नगराध्यक्ष वैभव वानखडे, वणीचे सरपंच मुकुंद पुनसे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष छाया दंडाळे, विनोद कडगे, सागर खांडेकर आदी लोकप्रतिनिधींनी आग लागल्याचे कळताच घटनास्थळी धाव घेतली. एवढेच नव्हे तर ग्रामस्थांना आग विझविण्यात सहकार्य केले. आ. ठाकूर यांनी स्वत: पुढाकार घेऊन पाण्याची बकेट व मातीच्या साहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
गावांनाही वेढा
आग रौद्र रूप धारण करीत वणी, ममदापूर, सुलतानपूर, नमस्कारी या गावांपर्यंत पसरली. यात दोन संत्राबागा, शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावापर्यंत आग पसरल्याने नागरिकांनी घराबाहेर निघून पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
पाच बंबांनी विझविली आग
वर्धा जिल्ह्यातील आष्टी, आर्वी व अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, अमरावती येथील पाच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनेची दाखल झाल्या होत्या. तब्बल सहा तासांनंतर आग आटोक्यात आली.

Web Title: Fire at four villages in Tivasa taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग