मोर्शीत फ्रूट मार्केटला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2017 12:03 AM2017-03-23T00:03:55+5:302017-03-23T00:03:55+5:30
शहरातील जयस्तंभ चौकातील महसूलच्या जागेतील दुकानांना बुधवारी पहाटे ४ वाजता आग लागली.
८ दुकाने भस्मसात : लक्षावधीची हानी
मोर्शी : शहरातील जयस्तंभ चौकातील महसूलच्या जागेतील दुकानांना बुधवारी पहाटे ४ वाजता आग लागली. यामध्ये फळे व पान विक्रेत्यांची ८ दुकाने जळून खाक झाली. आगीत लाखोंची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याआगीत फळांसह विक्रीसाठी आवश्यक साहित्य, उधारीच्या नोंदी असलेल्या वह्या, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. आगीवर मोर्शी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले.
असदखाँ गुलजारखाँ, अमिन जहिरुद्दीन, रामकृष्ण श्रीराव, समदखाँ बिसमिल्ला खाँ, प्रदीप गाढवे,
यापूर्वीही तीन वेळा आग
मोर्शी : संजय नागपुरे, शेख इम्रान यांच्या दुकानातील फळे व अन्य साहित्य आणि मानकलाल साहू यांची पानटपरी असा अंदाजे ३ लाखांचा ऐवज भस्म झाला.
याप्रकरणी फळविक्रेते असदखाँ गुलजारखाँ, रा. मुकासपुरा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. यापूर्वीही या फळमार्केटला ३ वेळा आगी लागल्या आहेत.
दरवेळी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जाते; तथापि घटनास्थळी विविध शंकाकुशंका व्यक्त होत आहेत.
आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. (तालुका प्रतिनिधी)