बडनेराजवळ धावत्या मालगाडीच्या पेट्रोल टँकरला आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 07:13 PM2019-04-29T19:13:47+5:302019-04-29T19:17:56+5:30

बावन्न टँकर पेट्रोलने भरून नेत असताना मालगाडीच्या एका टँकरला आग लागल्याची बाब बडनेरापासून जवळच असणाऱ्या  टीमटाला रेल्वेस्थानकावर लक्षात आली.

fire in oil tanker train near Badnera, fortunately a major accident was avoided | बडनेराजवळ धावत्या मालगाडीच्या पेट्रोल टँकरला आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

बडनेराजवळ धावत्या मालगाडीच्या पेट्रोल टँकरला आग, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Next

अमरावती- बावन्न टँकर पेट्रोलने भरून नेत असताना मालगाडीच्या एका टँकरला आग लागल्याची बाब बडनेरापासून जवळच असणाऱ्या  टीमटाला रेल्वेस्थानकावर लक्षात आली. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या पेट्रोल टँकरला वेळीच विझविण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजता घडली.

पानेवाडी येथून पेट्रोल भरून ५२ टँकरची मालगाडी लाखोडी येथे जात  होती. या गाडीच्या इंजिनपासून २३ क्रमांकाच्या टँकरला आग लागल्याचे मालगाडीचे गार्ड एस.एम. मगर यांच्या लक्षात आली. त्यांनी वाकीटाकीद्वारे पायलट पी.व्ही. नगनारे, स्टेशन मास्तर सुनीता बोडखे यांना दिली. सदर माहिती टिमटाला स्टेशन मास्तर सतीश अढावू यांना दिल्यावर ही मालगाडी टीमटाळा रेल्वे स्थानकावर उभी करण्यात आली. दरम्यान अग्निशमन दलाचे बंब, बडनेरा रेल्वे पोलीस, गावकरी घटनास्थळी पोहोचले. तत्काळ रेल्वे प्रशासनाने ओव्हरहेड विद्युत पुरवठा खंडित केला व ज्या डब्याला आग लागली त्याच्यासमोरील व मागील टँकर मोकळे करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी टँकरची आग शमविली.

बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस.डी. वानखडे, कर्मचारी राहुल हिरोडे, राजू व-हाडे, अग्निशमन दलाचे अमरावती येथील हर्षद दहातोंडे, सतीश घाटे, आकाश राऊत, धनराज कांदे, वैभव गजभारे, श्रेयस मेटे, अजय ढोके, नझीर अहमद, चांदूर रेल्वेचे अमोल कडू, मयूर घोडेस्वार, अविनाश यादव यासह रेल्वे प्रशासनाचे इतर अधिकारी, कर्मचारी, परिसरातील गावक-यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठी घटना घडली असती. टँकरला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अमरावती महापालिका व चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या अग्निशमन कर्मचाºयांनी शर्थीचे प्रयत्न केले.

रेल्वे गाड्या दोन तास खोळंबल्या
धावत्या मालगाडीच्या पेट्रोल टँकरला आग लागल्यामुळे नागपूर व अकोल्याहून येणाºया प्रवासी व मालगाड्या अडवून ठेवण्यात आल्या. तब्बल दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेमुळे गोंडवाना एक्सप्रेस, पुरी-अहमदाबाद, दोन्ही बाजूने येणाºया महाराष्टÑ एक्सप्रेस उशिराने धावल्यात. याचा काहीसा फटका प्रवाशांना बसला.

उष्णतेमुळे टँकरला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
सध्या उन्हाचा पारा प्रचंड आहे. तीव्र उष्णतेमुळे पेट्रोल टँकरला आग लागली असावी, असा अंदाज रेल्वेचे अधिकारी लावत आहेत. प्रत्यक्षात मात्र त्याचे नेमके कारण शोधले जाईल, असेही सांगण्यात येत आहे.

Web Title: fire in oil tanker train near Badnera, fortunately a major accident was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.