पेढी गावातील घराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:28 PM2019-02-15T23:28:02+5:302019-02-15T23:28:18+5:30
लगतच्या पेढी गावातील क्वार्टर भागातील रहिवासी श्यामराव हरिश्चंद्र सोळंके यांच्या घराला शुक्रवारी दुपारी आग लागली. या आगीत त्यांचे झोपडीवजा घर जळून खाक झाले. ग्रामस्थांनी वेळेवर धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कुडामातीचे घर स्वाहा झाले. शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भातकुली : लगतच्या पेढी गावातील क्वार्टर भागातील रहिवासी श्यामराव हरिश्चंद्र सोळंके यांच्या घराला शुक्रवारी दुपारी आग लागली. या आगीत त्यांचे झोपडीवजा घर जळून खाक झाले. ग्रामस्थांनी वेळेवर धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कुडामातीचे घर स्वाहा झाले. शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली.
श्यामराव सोळंके हे कुटुंबासह साखरपुड्याच्या एका कार्यक्रमास बाहेरगावी गेले होते. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.
पोलीस पाटील राजू तेलमोरे, तलाठी एस.एस. गिल, सरपंच शीला हजारे यांनी घटनास्थळ गाठून आगीबाबत माहिती घेतली. गावातील रामधन तेलमोरे, बाळाभाऊ मठ्ठा, बंडू लेंडे, प्रशांत ठाकरे, प्रभाकर माने या तरुण मंडळीने आग विझविण्याकरिता आटोकाट प्रयत्न केले. भातकुली पोलीस ठाण्यातील जमादार इंगळे, काळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.