हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात अग्नी तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:49 PM2018-04-19T22:49:01+5:302018-04-19T22:49:01+5:30
रिसाल व्याघ्र प्रकल्प वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला भीषण आंग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपतीचे नुकसान झाले. वन्यप्राण्यांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. ही आग वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अगदी २ किमी अंतरावर लागल्याचे सांगाण्यात येत आहे.
अमरावती - हरिसाल व्याघ्र प्रकल्प वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला भीषण आंग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपतीचे नुकसान झाले. वन्यप्राण्यांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. ही आग वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अगदी २ किमी अंतरावर लागल्याचे सांगाण्यात येत आहे. त्यामुळे माहिती होताच वनपरिक्षेत्राधिकाºयांसह पथक वेळीच जंगलात पोहचले खरे; मात्र या वनपरिक्षक्षेत्रात पाणवठ्यांची संख्या अल्प असल्याने पाणी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. अखेर झाडांच्या हिरव्या फांद्या तोडून आगी नियंत्रण मिळविल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांनी दिली.
अमरावती मुख्य रस्त्याच्या हरिसाल व रोरा या गावाच्या मध्यभागी असलेल्या अकोट फाट्याजवळील व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात आगीने अग्नी तांडव केल्याने मोठ्या प्रमाणात जंगल भस्मसात झाले. या आगीत जवळपास ४० ते ५० हेक्टर जंगल खाक झाल्याची माहिती समोर आलीे आहे. विशेष म्हणजे हरिसाल वनपरिक्षेत्रात सिपना डोह असल्याने येथे पाणी पिण्यासाठी बहुतांश वन्यप्राणी येतात. वाघ, राणगवा, म्हैस, ससे, मोर, हरिण, सांबर आदी वन्यप्राण्यांची या भागात सर्वाधिक संख्या असल्याने या आगीचा फटका वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणात बसला.
सिपना नदी असून बारामाही सिपना नदीत पाणी राहत असल्याने जवळपास उन्हाळ्यात वन्य प्राणी याच सिपना नदीवर पाणी पिण्याकरिता येतात. मात्र या आगीने जंगल जाळून खाक झाल्याने वन्यप्राणी असुरक्षित झाल्याचे बोलल्या जात आहे. वन्यजीव विभागाकडून होणाºया वन्यप्राणी गणनेवर परिणाम होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांसह वनौषधींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.