जरुड येथे आगीत तीन घरे भस्मसात
By admin | Published: November 10, 2016 12:08 AM2016-11-10T00:08:27+5:302016-11-10T00:08:27+5:30
स्थानिक बसस्थानक परिसरात दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत तीन घरे भस्मसात झाली.
अडीच लाखांची हानी : आर्थिक मदतीची मागणी
जरूड : स्थानिक बसस्थानक परिसरात दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत तीन घरे भस्मसात झाली. यामध्ये अडीच लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वरुड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले.
बसस्थानकामागील परिसरात बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास शांताबाई महिंद्रे या महिलेच्या घराला अचानक आग लागली. पाहता-पाहता या आगीत बाबाराव दोडके, पुंडलिक चरपे यांच्या घराला सुद्धा आगीने घेरले. शेजारच्या आरागिरणीवरील मजुरांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले तर वरुड नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले. बिट जमादार विनोद बाभुळकर, तलाठी राजेंद्र जंगलेसह सरपंच भावना फुसे, भाजपच्या महिलाध्यक्ष अंजली तुमडाम आदींनी भेट देऊन पाहणी केली.