त्रिपुरा हिंसाचाराची आग; अमरावतीच्या चांदणी चौकात दोन समुदायांचे गट आमने-सामने, पोलिसांचा हवेत गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 03:05 PM2021-11-13T15:05:11+5:302021-11-13T15:06:52+5:30
यावेळी मोर्चेकऱ्यांवर वज्र वाहनातून पाण्याचा मारा करण्यात आला. शुक्रवारच्या तणावामुळे शहरात काही तरी अघटित घडणार, अशी अटकळ बांधली जात होती. ही भीती खरी ठरली. बंदच्या अनुषंगाने अमरावती शहरातील बहुतांश दुकाने आज उघडलीच नाही.
अमरावती -त्रिपुरातील हिंसाचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लीम समुदायाने पुकारलेल्या बंद दरम्यान प्रचंड दगडफेक झाली. त्याच्या निषेधार्थ भाजपने शनिवारी अमरावती बंदची हाक दिली होती. या बंद दरम्यान शहराचे हृदयस्थान असलेल्या राजकमल चौकातून निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी दगडफेक करीत काही दुकानांना लक्ष्य केले. तोडफोड व जाळपोळही केली. त्यांना अटकाव करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केला. एवढेच नाही, तर येथील चांदणी चौक भागात दोन समुदायांचे गट आमने-सामने आले होते. तसेच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबारही करावा लागला.(Groups of two communities Face to face in Amravati Chandni Chowk)
यावेळी मोर्चेकऱ्यांवर वज्र वाहनातून पाण्याचा मारा करण्यात आला. शुक्रवारच्या तणावामुळे शहरात काही तरी अघटित घडणार, अशी अटकळ बांधली जात होती. ही भीती खरी ठरली. बंदच्या अनुषंगाने अमरावती शहरातील बहुतांश दुकाने आज उघडलीच नाही.
वाहनांची जाळपोळ लाखोंचे नुकसान -
वाहने व गाड्यांच्या जाळपोळीतून लाखोंचे नुकसान झाले आहे. तथापि, इतवारा बाजार परिसरातील मुस्लिमबहुल भागात तगडा बंदोबस्त पोलिसांनी यापूर्वीच लावला. त्या भागातून मोर्चेकऱ्यांना परतवून लावण्यात पोलीस यशस्वी ठरले.
अमरावतीच्या चांदणी चौकात दोन समुदायांचे गट आमने-सामने, पोलिसांचा हवेत गोळीबार#amravativiolence#Tripuraviolencepic.twitter.com/QSH6jVHkpp
— Lokmat (@lokmat) November 13, 2021
यादरम्यान अमरावती शहरात पुढील चार दिवस संचारबंदी व इंटरनेट बंदी लागू करण्यात आली असल्याचे सुटीवर असलेल्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी सांगितले. अमरावतीकरिता तातडीने रवाना झालो असून सायंकाळपर्यंत शहर गाठू, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
युवकाचा पंजा गायब -
पोलिसांनी जमावाच्या दिशेने सोडलेले अश्रुधुराचे नळकांडे मोर्चेकऱ्यांपैकी एकाने झेलले. ते त्याच्या हातातच फुटले व संपूर्ण पंजा क्षतविक्षत होऊन गायब झाला. राजकमल चौकात हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे.