अचलपूर बाजार समितीकडून हाडपकापूर्वीच फोडले गेलेले फटाके चर्चेत बच्चू कडूंच्या शाब्दिक आतषबाजीत ईडी......
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:46+5:302021-09-23T04:14:46+5:30
अनिल कडू परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हाडपकापूर्वीच फोडले गेलेले फटाके सहकार क्षेत्रात चांगलेच चर्चेत आले आहेत. ...
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हाडपकापूर्वीच फोडले गेलेले फटाके सहकार क्षेत्रात चांगलेच चर्चेत आले आहेत. बाजार समितीकडून संत गाडगेबाबा शेतकरी व्यापारी संकुलाचा शनिवार, १८ सप्टेंबरला उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव पवन सार्वे उपस्थितांना व्यासपीठावर दिसून आले नाहीत. यात माजी सचिव अरडक यांचा राबता व्यासपीठावर बघायला मिळाला. सचिव पवन सार्वे यांची ही अनुपस्थिती लक्षवेधक ठरली. कार्यक्रमादरम्यान ते सर्वांत मागे एका कोपऱ्यात उभे होते. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हा उद्घाटन सोहळा, संचालकांची मुदत संपल्यानंतर घाईगडबडीत घेण्यामागचे कारण, लगेच सुरू होणारा हाडपक असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट केले गेले. म्हणे हाडपकात शुभ कार्य नको. या हाडपकाच्या दहशतीत लागलीच निमंत्रण पत्रिका छापल्या गेल्या; पण हाडपकाच्या या घाईत अनेकांपर्यंत निमंत्रण पत्रिका पोहोचूच शकल्या नाहीत. कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमदार सुलभाताई खोडके कार्यक्रमाला येऊ शकल्या नाहीत. कार्यक्रमस्थळी फटाक्यांची जय्यत तयारी केल्या गेली. पाहुणे आले की फटाके फोडायचे; पण हे फटाके पाहुणे येण्यापूर्वीच फोडले गेले आणि बाजार समितीकडून हाडपकापूर्वी फोडले गेलेले हे फटाके चर्चेत आलेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याप्रसंगी आपल्या शाब्दिक आतषबाजीत खरेदी-विक्री आणि ईडीचा उल्लेख केला. सहकार क्षेत्राचा समाचार घेतला. जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंतही ते पोहोचलेत.
** संचालकांची मुदत संपली-- शासन आदेशानुसार अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २ सप्टेंबर २०२१ ला संपली आहे. मुदत संपल्यानंतर हा उद्घाटन सोहळा हाडपकाच्या भीतीपोटी बाजार समितीकडून आयोजित केला गेला. मात्र, तो सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आणि हाडपकापूर्वी बाजार समितीकडून फोडले गेलेले फटाके चर्चेत आले आहेत. **
कोट:-- गणेश विसर्जनानंतर लागलीच हाडपका सुरू होत असल्यामुळे घाईगडबडीत अगदी वेळेवर व्यापारी संकुलाचे उद्घाटन घेतले गेले. यात अनेकांपर्यंत कार्यक्रमाच्या पत्रिका पोहोचू शकल्या नाहीत. - अजय पाटील टवलारकर, सभापती, बाजार समिती अचलपूर.
कोट:-- लागणाऱ्या हाडपकामुळे व्यापारी संकुलाच्या उद्घाटनाची घाई केली गेली. यातच राज्यमंत्री बच्चू कडू यांची १८ सप्टेंबर ही तारीख मिळू शकली. सतीश व्यास, संचालक, व्यापारी व अडते, बाजार समिती अचलपूर. दिनांक 20/9/21 फोटो दिनांक22/9/21