१६० व्यक्तींवर एफआयआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 10:25 PM2019-03-06T22:25:29+5:302019-03-06T22:25:53+5:30

शहरातील चौकाचौकांचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंगविरोधात आता बाजार व परवाना विभागाने कारवाईचा सपाटा लावलेला आहे. या पाच दिवसांत ३२० होर्डिंग जप्त करण्यात आले, तर १६० व्यक्तींविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी करून एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

FIRs on 160 persons | १६० व्यक्तींवर एफआयआर

१६० व्यक्तींवर एफआयआर

Next
ठळक मुद्देअनधिकृत जाहिरातबाजीला लगाम : पाच दिवसांत ३२० होर्डिंग काढले, कारवाई निरंतर राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील चौकाचौकांचे विद्रुपीकरण करणाऱ्या अनधिकृत होर्डिंगविरोधात आता बाजार व परवाना विभागाने कारवाईचा सपाटा लावलेला आहे. या पाच दिवसांत ३२० होर्डिंग जप्त करण्यात आले, तर १६० व्यक्तींविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी करून एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. या सर्व प्रकरणात महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
बाजार परवाना विभागाच्या सहायक आयुक्त निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनात बाजार परवाना विभागाद्वारे ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये राजकमल चौक, राजापेठ, नवाथे चौक, गोपालनगर, बेनाम चौक, यशोदा नगर, दस्तुरनगर, बियाणी चौक, चपराशीपुरा, कोर्ट परिसर, गर्ल्स हायस्कूल, पंचवटी चौक, शेगाव नाका परिसर, कठोरा नाका, विलासनगर, कॉटन मार्केट, इर्विन चौक, पठाण चौक, जयस्तंभ व बडनेरा येथीळ ३२० अनधिकृत होर्डिंग व फलक या पाच दिवसांत काढण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. या कारवाईत बाजार व परवाना विभागाचे संकेत वाघ, अभियंता शेखर ताकपिरे, राहुल वैद्य, सागर आठोर, अतिक्रमण विभागाचे प्रवीण इंगोले, निरीक्षक व पोलीस पथकाचे मनीष मानकर यांनी ही संयुक्त कारवार्ई केली.
प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र अधिकारी
स्वच्छ सर्वेक्षणात शहराचे सौंदर्यीकरणदेखील तेवढेच महत्त्वाचे असल्याने त्यासाठी प्रत्येक झोनला एक स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येर्ईल. सध्या एकच अधिकारी असल्याने मर्यादा येत आहेत. त्यामुळे आता या अनधिकृत फलकासाठी प्रतिबंध करण्यात येईल. एफआयआर दाखल करणे ही शेवटची व चौथी स्टेप आहे. त्यापूर्वी आम्ही सर्व प्रकारात सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे आयुक्त संजय निपाणे यांनी सांगितले.

Web Title: FIRs on 160 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.