भातकुली तालुक्यात सातच शाळांमध्ये वाजली पहिली घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:11 AM2021-07-16T04:11:13+5:302021-07-16T04:11:13+5:30
२५ ग्रामपंचायतींचे ठराव अप्राप्त फोटो - टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यात आठवी ते बारावीपर्यंतच्या एकूण ४२ शाळा आहेत. त्यापैकी ...
२५ ग्रामपंचायतींचे ठराव अप्राप्त
फोटो -
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यात आठवी ते बारावीपर्यंतच्या एकूण ४२ शाळा आहेत. त्यापैकी गुरुवारी पहील्या दिवशी केवळ सात शाळाच सुरू झाल्या. इतर शाळांचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे अप्राप्त असल्याने तेथे शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.
तालुक्यातील सुरू होणाऱ्या शाळांमध्ये म्हैसपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय, परलाम येथील माध्यमिक विद्यालय, खारतळेगाव येथील शिवाजी हायस्कूल, निंभा विद्यालय, अळणगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा तसेच कामनापूर व ऋणमोचन येथील शाळांचा समावेश आहे. खारतेळगाव येथे गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे व केंद्रप्रमुख सुनील पांडे यांनी भेट दिली. शाळा सुरू करण्याबाबत २५ ग्रामपंचायतींचे ठराव अप्राप्त असल्याचे गटशिक्षणाधिकारी घुगे म्हणाले.
150721\1747-img-20210715-wa0103.jpg
भातकुली तालुक्यात सातच शाळांमध्ये वाजली पहीली घंटा
२५ ग्रामपंचायतींचे ठराव अप्राप्त