शाळा, शिक्षकांना न पाहताच पहिलीतील मुले गेली दुसरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:54+5:302021-04-15T04:12:54+5:30

अमरावती : ग्रामीण भागातील बरेच कुटुंबातील पालकांना स्मार्ट फोन कसा हाताळवा, हेच कळत नाही. चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना यातील ...

The first children went to the second school without seeing the teachers | शाळा, शिक्षकांना न पाहताच पहिलीतील मुले गेली दुसरीत

शाळा, शिक्षकांना न पाहताच पहिलीतील मुले गेली दुसरीत

Next

अमरावती : ग्रामीण भागातील बरेच कुटुंबातील पालकांना स्मार्ट फोन कसा हाताळवा, हेच कळत नाही. चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना यातील ज्ञान फार कमी असते. त्यामुळे ग्रामीण भागातील पालकांचा चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. असे असताना शाळा व शिक्षकांना न पाहताच पहिलीच्या मुलांना दुसऱ्या वर्गात दाखल करण्यात आले. दुसरीत जाऊनही या मुलांना येत नाही. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शासनाने शाळा महाविद्यालय बंद ठेवली आहेत. यामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबली. मात्र, ग्रामीण भागात या प्रणालीचा फारसा लाभ झाला नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत आणि ज्यांच्याकडे आहेत ते नेटवर्कमुळे वैतागले आहेत. असे असले तरी ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेण्यास असमर्थ असल्याचे दिसून येत आहे. मुलाला मागील वर्षी जिल्हा परिषद शाळेत पहिल्या वर्गात दाखल केले, गणवेश पुस्तके ही मिळाली पण शिक्षण मिळाले नाही. आता तो वर्ग खोलीत न बसता आणि शिक्षकांना न पाहताच शासनाचे निर्णयामुळे दुसरीत गेला असे पालक सांगत आहेत.

बॉक्स

पुन्हा अ आ इ पासून सुरुवात

कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या शिक्षणात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजूर मोठ्या प्रमाणात आहेत. ही मंडळी दिवसभर शेतात असतात आणि मुले खेळण्यात व्यस्त असतात. त्यामुळे मुले पुस्तक उघडून पाहत नाही. परिणामी मागील शिक्षण नाही विसरत असल्याचे दिसून येते. यामुळे या मुलांना पुन्हा अ.आ.ई.पासून शिकवावे लागेल की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: The first children went to the second school without seeing the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.