पहिला दिवस नटला नवलाईने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:03 PM2018-06-26T22:03:06+5:302018-06-26T22:03:24+5:30
नवीन दप्तर, नवीन वहया, पुस्तके, नवा युनीफार्म नवे मित्र,मैत्रिणी यांच्या जोडीला शाळा परिसरात प्रभात फेऱ्या अशा वातावरणात शाळेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला.शाळामध्ये विद्यार्थ्याना मोफत पाठपुस्तकांचे वाटपही करण्यात आले. या पहिल्या दिवसाचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी सकाळपासून पालकांची साथ होती.
अमरावती : नवीन दप्तर, नवीन वहया, पुस्तके, नवा युनीफार्म नवे मित्र,मैत्रिणी यांच्या जोडीला शाळा परिसरात प्रभात फेऱ्या अशा वातावरणात शाळेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला.शाळामध्ये विद्यार्थ्याना मोफत पाठपुस्तकांचे वाटपही करण्यात आले. या पहिल्या दिवसाचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी सकाळपासून पालकांची साथ होती.
शहरासह ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये उत्साहवर्धक वातावरण होते.शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पालकांसह विद्यार्थ्याचे रोपटे देऊन जिल्हा परिषद पदाधिकाऱ्याच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
नवप्रवेशित मुलांचे अनोखे स्वागत, पुष्पवर्षाव
शाळेच्या पहिल्याच दिवशी नवप्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गुलाब फुलांच्या पाकळ्या सजविल्या. फुलांच्या पाकळ्यांच्या पदस्पर्शानंतर ताटातील रंगात पाय भिजवून पाऊलखुणा कागदावर उमटविल्या. हा आगळा उपक्रम महापालिकेच्या वडाळीस्थित एसआरपीएफ शाळेत मंगळवारी राबविण्यात आला. मुलांचे शाळेतील पहिले पाऊल पडताना पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हावभाव दिसून आले. मुलांच्या पाऊलखुणांचा तो कागद पालकांना भेट देण्यात आला. शाळा व्यवस्थापनाचा हा उपक्रम पाहून पालकवर्ग गहिवरले. या नवख्या उपक्रमासाठी नगरसेवक आशिष गावंडे, मुख्याध्यापिका प्रिति खोडे, योगेश पखाले, राहुल तायडे, योगेश चाटे, उज्वला भिसे यांनी परिश्रम घेतले असून शाळेचा पहिला दिवस पालकांकरिता चिरस्मरणीय बनविला होता.
लोकप्रतिनिधींचाही सहभाग
विद्यार्थ्यांचे स्वागतासाठी झेडपी अध्यक्ष,नितीन गोंडाणे,आ. वीरेंद्र जगताप यांनी मांजरखेड येथील शाळेत तर उपाध्यक्ष दत्ता ढोमणे,शिक्षण सभापती जयंत देशमुख, आदीसह सीईओ मनिषा खत्री प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री राऊत, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलीमा टाके आदीनी शाळेच्या पहिल्या दिवशी अमरावती तालुक्यातील पुसदा येथे कार्यक्रमात सहभाग घेतला.