विद्यार्थी घडविणे हे शिक्षकाचे प्रथम कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:05 AM2021-08-02T04:05:44+5:302021-08-02T04:05:44+5:30
दिलीप इंगोले, आदर्श हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयात समारंभ दर्यापूर : भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून श्री शिवाजी शिक्षण ...
दिलीप इंगोले, आदर्श हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयात समारंभ
दर्यापूर : भाऊसाहेबांनी शेतकऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या. त्या मुलांना घडवून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षकांनी सतत प्रयत्नरत कार्य करावे, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी केले. स्थानिक आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक गजानन कोरडे यांच्या सत्कार समारंभात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ उपस्थित होते. शाळा समितीचे सदस्य प्राचार्य केशवरावजी गावंडे, मधुकरराव तराळ, शाळा निरीक्षक विनायकराव गावंडे, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका कल्पना धोटे, शिक्षक प्रतिनिधी बोचे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शिक्षिका सुहासिनी भारसाकळे यांच्या मार्गदर्शनात मुलींनी स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका कल्पना धोटे यांनी केले. डी.बी. ठाकरे, पी.एम. काळे, बोचे यांनी बोचे संचालन केले. आभार अनिल भारसाकळे यांनी मानले.
010821\1222-img-20210801-wa0008.jpg
विद्यार्थी घडविणे हे शिक्षकाचे प्रथम कर्तव्य श्री दिलीपबाबु इंगोले (आदर्श हायस्कूल येथे पर्यवेक्षक श्री कोरडे सर यांचा सत्कार समारंभ)