पुस्तकाविना सुरू झाली पहिली ते आठवीची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:33+5:302021-07-20T04:10:33+5:30
अमरावती : दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली जातात. मात्र, यंदा जुलै महिना अर्ध्यावर येऊनही पाठ्यपुस्तकांबाबत निर्णय ...
अमरावती : दरवर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच मोफत पाठ्यपुस्तके वाटप केली जातात. मात्र, यंदा जुलै महिना अर्ध्यावर येऊनही पाठ्यपुस्तकांबाबत निर्णय झालेला नाही. सध्या आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठपुस्तकांविनाच शिकवणी सुरू झालेली आहे. शिक्षण विभागाने यंदा २ लाख ५८ हजार १८५ पुस्तकांची नोंद बालभारतीकडे केली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात ही पुस्तके येण्याची शक्यता आहे.
सर्वशिक्षा अभियानाकडून जिल्हा परिषद, नगरपालिका व खासगी शाळांमधील अनुदानित पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्याथ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. सर्वशिक्षा अभियानाकडून दरवर्षी बालभारती मंडळाकडे रीतसर नोंदणी करण्यात येते.नोंदणीकेलेली पाठ्यपुस्तके अमरावती
बालभारती डेपोतून जून महिन्यात सुरुवातीपासूनच पंचायत समितीस्तरावर वितरित करण्यात येतात. जिल्ह्यातील चौदाही पंचायत समित्यांस्तरावर पाठ्यपुस्तके पोहोचल्यानंतर येथील विद्यार्थिसंख्येनुसार शाळास्तरावर येतात. गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांना पाठ्यपुस्तके देण्यात शैक्षणिक सत्राला सुरुवात होताच पुस्तके विद्यार्थ्यांना दिली जातात. मात्र यंदा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्राथमिक शाळा सुरू होण्यावर सध्यातरी संभ्रमावस्था आहे. शैक्षणिक सत्र २८ जूनपासून सुरू झाले आहे. आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, अजूनही पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात आलेली नाहीत. जुलै महिन्यातील १९ दिवस लोटले आहेत. परंतु, पाठ्यपुस्तकांच्या दृष्टीने अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.
---------------------
वर्गनिहाय विद्यार्थी संख्या
*पहिली -२८३४३
*दुसरी -२५०९५
*तिसरी -२६९५७
*चौथी -३०९७३
*पाचवी -३५८२३
*सहावी - ३५८०६
*सातवी - ३७७६४
*आठवी -३७४२४