सुपर स्पेशालिटीत पहिल्यांदा किडनी प्रत्यारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:15 AM2018-04-05T00:15:56+5:302018-04-05T00:15:56+5:30

डायलिसिसवर असलेल्या मुलास किडनी दान करून वडिलाने जीवदान दिले. विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. शहरात प्रथमच अशा प्रकारे नि:शुल्क किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली आहे.

First Kidney Transplant In Super Specialty | सुपर स्पेशालिटीत पहिल्यांदा किडनी प्रत्यारोपण

सुपर स्पेशालिटीत पहिल्यांदा किडनी प्रत्यारोपण

Next
ठळक मुद्देप्रथमच प्रयोग : वडिलांच्या किडनी दानामुळे मुलास जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डायलिसिसवर असलेल्या मुलास किडनी दान करून वडिलाने जीवदान दिले. विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. शहरात प्रथमच अशा प्रकारे नि:शुल्क किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली आहे.
जळगाव जामोद येथील रहिवासी श्रीकांत गोवर्धन टावरी (३२) गत वर्षांपासून किडनीतज्ज्ञ अविनाश चौधरी यांच्याकडे उपचार घेत होता. त्यानंतर श्रीकांतला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे तो डायलिसीसवर उपचार घेत होता. किडणीदानाचा निर्णय झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनात किडनीतज्ज्ञ अविनाश चौधरी, विक्रम कोकाटे, निखिल बडनेरकर, सौरभ लांडे, युरोलॉजीस्ट राहुल पोटोडे, विशाल बाहेकर व विक्रम देशमुख यांनी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसंबंधित प्रक्रिया सुरू केली. श्रीकांतच्या सर्व चाचण्या केल्यात.
त्यानुसार सुपर स्पेशालिटीतील डॉक्टरांनी नागपूर येथील युरोलॉजिस्ट संजय कोलते व किडनीतज्ज्ञ समीर चौबे यांच्या मार्गदर्शनात बुधवारी सकाळी ११ वाजता किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू केली. ही शस्त्रक्रिया सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालली. श्रीकांत व त्याचे वडील गोवर्धन यांची प्रकृती चांगली असून भविष्यात काय काळजी घ्यायची, याबाबत डॉक्टरांनी सूचना दिल्या आहेत.
किडनी प्रत्यारोपण सेन्टरला मान्यता
सुपर स्पेशालिटीत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला मान्यता मिळविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. विविध अडथळे पार करून त्यांनी २५ प्रकारच्या एनओसी मिळवून शासनाकडे प्रस्ताव सादर केला. राज्य सरकारने दखल घेत अखेर सुपर स्पेशालिटीला किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली. अमरावतीत ही सोय करून देण्यात आल्याने विदर्भातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: First Kidney Transplant In Super Specialty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.