पहिलीने सोडले, दुसरी फसली; तिसरी नांदण्यावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:43 PM2018-02-13T22:43:09+5:302018-02-13T22:44:40+5:30

वडाळीतील २३ वर्षीय अंध तरुण व नागपुरातील बजाजनगर येथील अंध युवतीच्या प्रेमप्रकरणाने नवे वळण घेतले आहे. त्याचे हे तिसरे लग्न असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले.

First released, second crop; The third is firm on the ninth | पहिलीने सोडले, दुसरी फसली; तिसरी नांदण्यावर ठाम

पहिलीने सोडले, दुसरी फसली; तिसरी नांदण्यावर ठाम

googlenewsNext
ठळक मुद्देअंध तरुणाचा प्रताप : फ्रेजरपुरा ठाण्यात पोहोचले प्रकरण, तूर्तास दोघे एकत्र

अमरावती : वडाळीतील २३ वर्षीय अंध तरुण व नागपुरातील बजाजनगर येथील अंध युवतीच्या प्रेमप्रकरणाने नवे वळण घेतले आहे. त्याचे हे तिसरे लग्न असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. एवढेच नव्हे तर त्याच्याविरुद्ध दुसरी पत्नी न्यायालयात गेली आहे. तरीही तिसरी पत्नी त्याच्यासोबत राहण्यास ठाम आहे. दोघेही सज्ञान असल्याने फ्रेजरपुरा पोलिसांनी तूर्तास कोणतीही कारवाई न करता त्यांना मुक्त केले आहे.
फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडाळी परिसरात राहणारा अंध युवक प्रवीण सिद्धार्थ तायडे (२३) याची पहिली बायकोदेखील अंध होती. ती काही दिवसांत त्याला सोडून गेली. यानंतर दुसरीला प्रेमजाळ्यात अडकवून लग्न केले. मात्र, छळ व फसगत होत असल्याचे पाहून तिनेही सोडून दिले. त्याने नागपूरहून पळविलेल्या व विवाह केलेल्या तिसºया तरुणीच्या आईने मुलगी हरविल्याची तक्रार केली होती.
‘ती’ त्याच्यासोबतच राहणार
नागपूरच्या बजाजनगर पोलिसांनी प्रवीणला त्याच्या तिसºया पत्नीसह २० जानेवारी रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली. दोघेही सज्ञान व विवाहबद्ध असल्यामुळे पोलिसांना त्यांना सोडून देण्यात आले. मात्र, सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी पुन्हा या प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली. तो अंध पत्नीला घेऊन फे्रजरपुरा ठाण्यात पोहोचला तोच मुलीची आई आणि प्रवीणची दुसऱ्या क्रमांकाची पत्नी आईवडिलांसह ठाण्यात पोहोचली. ती लग्नापूर्वी जेथे वास्तव्यास होती, ते वसतिगृह चालविणारे पीआर पाटील अपंग एकात्मिक विकास शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पंजाब पाटीलसुद्धा सोबत होते. त्यांच्यासमक्ष प्रवीणचा दुसरा विवाह झाला होता. प्रवीणची छळकथाच तिने पोलिसांपुढे मांडली. तो कशाप्रकारे अंध मुलींना प्रेमजाळ्यात अडकवितो, पैशांच्या हव्यासापोटी फसवितो, हे तिने सांगितले. यावेळी प्रवीणच्या तिसऱ्या पत्नीने मात्र त्याच्यासोबत राहण्याची इच्छा पोलिसांकडे व्यक्त केली. त्यामुळे तिची आई हताश होऊन परतली. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर प्रवीण व त्याच्या तिसऱ्या पत्नीचे बयाण नोंदवून त्यांची मुक्तता केली.
प्रवीण करायचा मारहाण; दुसरी पत्नी न्यायालयात
प्रवीणच्या २० वर्षीय दुसऱ्या पत्नीने अंध मुलींच्या वसतिगृहात राहून बीएपर्यंत शिक्षण घेतले. एका लग्न समारंभात तिची ओळख प्रवीणसोबत झाली. दोघांनीही संस्था, आई-वडील व नातेवाइकांसमक्ष लग्न केले. ९ जानेवारी २०१७ रोजी कोर्टासमक्ष पुन्हा लग्न केले.वडाळीत भाड्याने खोली करून प्रवीण, त्याची आई, आजोबा व अंध पत्नी व सासरा असा चौघांचा संसार थाटला. मात्र, काही दिवसांतच प्रवीणने तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. भीक मागण्यासाठी मारहाण करण्यात येत होती. परिसरातील तरुणांना तो घरात आणायला लागला. तिच्या इच्छेविरुद्ध कामे करण्यास सांगू लागला. अखेर प्रवीणच्या त्रासाला कंटाळून तिने ९ नोव्हेंबर २०१७ रोजी न्यायालयात दाद मागितल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

Web Title: First released, second crop; The third is firm on the ninth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.