स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतकºयांची परिस्थिती भीषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:14 PM2017-08-21T22:14:20+5:302017-08-21T22:14:42+5:30
तीन वर्षांपासून दुष्काळ, नापिकी व शेतमालास मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी, शेतमजुरांची तरूण पिढी आर्थिक अडचणीत सापडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूरबाजार : तीन वर्षांपासून दुष्काळ, नापिकी व शेतमालास मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी, शेतमजुरांची तरूण पिढी आर्थिक अडचणीत सापडली आहे. परिणामी त्यांना आत्महत्येचे पाऊल उचलावे लागत असून यासंदर्भात सरकारची असलेली असंवेदनशील भूमिका स्वातंत्र्यानंतर प्रथमच पहायला मिळत आहे. शेतकºयांची अवस्था भीषण असल्याचा आरोप किसान मंचाचे नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी केले.
किसान मंचाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियान यात्राचे चांदूरबाजार ेयेथे आगमण झाले. यावेळी संगेकर मंगल कार्यालयात आयोजित सभेत ते बोलत होते. किसान मंचांची ही अभियान यात्रा सेवाग्राम ते नाशिक पर्यंत काढण्यात आली असून राज्यातील ३० जिल्ह्यात जनजागृती करणार आहे. या यात्रेचे चांदूरबाजार येथे स्वागत करण्यात आले.
आताच्या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने न पूर्ण केली नसून हा शेतकºयांशी केलेल्या विश्वासघात आहे. आयात निर्यातीचे शासकीय धोरण चुकीचे असल्याने ते शेतकºयांच्या जीवावर उठले आहे. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र यावे. शेतकरी हित हेच लक्ष्य ठेवणे गरजेचे असल्याचेही शंकर अन्ना म्हणाले.
मंचावर सुरेखा ठाकरे, किशोर माथनकर, श्रीकांत तराळ, संजय कोल्हे, विलास चोपडे, गणेश खारकर, वसंतराव बोंडे, दता पवार प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्तविक नंदकुमार बंड यांनी केले. यावेळी प्रदीप येवले, स्मिता घोगरे, राजू राऊत, प्रकाश ठाकरे, बाबासाहेब लंगोटे, सुभाष उभाट, बाळासाहेब चºहाटे, डॉ.नरेंद्र देशमुख, घनश्याम पेठे, काशीनाथ फुटाने, संजय तायडे, अजय देशमुख विनायक चौधरी, संजय गुजर, अनीस भाई यांच्यासह चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.