पाच वर्षांत प्रथमच प्रकल्पात साठा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:33 PM2018-01-10T22:33:48+5:302018-01-10T22:34:57+5:30

यंदा सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेल्या पावसाचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत.

For the first time in five years the reservoir reserves decreased | पाच वर्षांत प्रथमच प्रकल्पात साठा कमी

पाच वर्षांत प्रथमच प्रकल्पात साठा कमी

googlenewsNext
ठळक मुद्देधोक्याची घंटा : मध्यम, लघु प्रकल्पांनी वाढविली चिंता

आॅनलाईन लोकमत
अमरावती : यंदा सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेल्या पावसाचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत. ऐन थंडीत जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पात सरासरी ६७ टक्के जलसाठा आहे. गत पाच वर्षांच्या तुलनेत प्रकल्पामध्ये यंदा सर्वात कमी जलसाठा आहे. मध्यप्रदेशातून पाण्याची आवक झाल्याने केवळ उर्ध्व वर्धा व पूर्णा प्रकल्पात ७५ टक्कयांपर्यत साठा आहे.
जिल्ह्यात उर्ध्व वर्धा हा एकमेव मुख्य प्रकल्प आहे. सद्यस्थितीत या प्रकल्यात समाधानकारक साठा आहे. मध्यम चार प्रकल्प आहेत. यामध्ये सरासरी ६७ टक्के साठा आहे. यामध्ये जर १० टक्के मृतसाठा व आगामी बाष्पीभवन गृहीत धरल्यास जिल्ह्याची तहान भागविण्यास हा साठा अपुरा ठरणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील किमान ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे अश्याव९रळी प्रकल्यातील पाणीसाठा देखील कमी होणार असल्याने जिल्ह्यात पाण्याची चांगलीच टंचाई जानवणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जलसंपदा विभागाच्या सोमवारच्या अहवालानुसार उर्ध्व वर्र्धा प्रकल्पात ३९७.५५ टिएमसी म्हणजेच ७०.४८ टक्के साठा आहे.परतीच्या पावसाच्या काळात मध्यप्रदेशातून पावसाची आवक वाढल्याने उर्ध्व वर्धा व पूर्णा या प्रकल्पात पाण्याची पातली वाढली होती. मात्रशहानूर प्रकल्पात सद्यस्थितित ६२ टक्के, पूर्णा प्रकल्पात ७७.४२ टक्के तर चंद्रभागा प्रकल्पात ६८.४८ टक्के तर सपन प्रकल्पात २७.८७ टिएमसी म्हणजेच २८.१२ टक्के जलसाठा आहे. या मध्यम प्रकल्पात एकूण ८२.९० टीएमसी साठा व ६७ टक्के साठा आहे. मागील वर्षी या सर्व प्रकल्पात याच तारखेला ८३.०४ टीएमसी, २०१४ मध्ये ९७.३३ टीएमसी, २०१३ मध्ये १११.३१ टीएमसी, तर २०१२ मध्ये ८६.८९ टीएमसी साठा होता. त्यामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी पाणीसाठा आहे. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.
लघु प्रकल्पात ४१ टक्केच साठा
जिल्ह्यात एकूण ४६ लघुु प्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत ४१. ४७ टक्केच जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये याच तारखेला ६२.६८ टक्के, २०१६ मध्ये ६७.९२ टक्के, २०१५ मध्ये ७६.११ टक्के, २०१३ मध्ये ६९.०५ टक्के, तर २०१२ मध्ये ६७.६६ टक्के साठा शिल्लक होता. यंदा मात्र सरासरीपेक्षा कमी पावसामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी साठा आहे.

Web Title: For the first time in five years the reservoir reserves decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.