तिवस्यातही प्रथमच नाफेडचे केंद्र सुरू

By admin | Published: May 17, 2017 12:02 AM2017-05-17T00:02:39+5:302017-05-17T00:02:39+5:30

जिल्हात सर्वत्र नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाले असताना तिवसा येथे केंद्र सुरू न केल्याने ....

For the first time, Nafed's center has started | तिवस्यातही प्रथमच नाफेडचे केंद्र सुरू

तिवस्यातही प्रथमच नाफेडचे केंद्र सुरू

Next

पणन संचालकांची कानउघाडणी : काँग्रेसच्या आंदोलनाला यश
लोकमत न्यूज नेटवर्क
तिवसा : जिल्हात सर्वत्र नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाले असताना तिवसा येथे केंद्र सुरू न केल्याने आ. यशोमती ठाकूर यांनी पणन् संचालकांसह जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरले. तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला. अखेर प्रशासनाने मंगळवारी नाफेडचे खरेदी केंद्र सुरु केले. येथे आ. यशोमतींच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरु करण्यात आली.
तिवसा येथे नाफेडची खरेदी नसल्याने व्यापाऱ्यांद्वारे शेतकऱ्यांची तूर बेभाव खरेदी करण्यात येत होती. अन्य केंद्रांवर तूर विक्रीसाठी नेल्यास शेतकऱ्यांना अर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. त्यामुळे तिवसा बाजार समिंतीच्या आवारातच शासकीय तूर खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी आ.यशोमती ठाकूर यांनी लाऊन धरली व रस्त्यावर उतरण्याचा ईशारा प्रशासनाला दिला. आंदोलनाच्या धसक्याने मंगळवारी डीएमओद्वारा शासकीय तूर खरेदी सुरु करण्यात आली. यावेळी बाजार समिती सभापती रामराम तांबेकर, उपसभापती कमलाकर वाघ, संचालक संजय वै. देशमुख, जिल्हा बँक संचालक सुरेश साबळे, तिवसा नगर पालिका उपाध्यक्ष वैभव वानखडे, संचालक गजानन देशमुख, प्रदीप बोके, योगेश वानखडे, गोपाल बिजवे, तुकाराम भोयर, रणजित राऊत, चर्जन, नाफेडचे मार्केटिंग अधिकारी देशमुख, सचिव रोंघे, तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख, पं.स. सदस्य लुकेश केने, श्याम देशमुख, प्रफुल्ल देशमुख, सुरेंद्र साबळे, शहराध्यक्ष अतुल देशमुख, माजी सभापती देवीदास डेहणकर, सरपंच बबलू मक्रमपुरे, युकाँ उपाध्यक्ष मुकुंद पुनसे, युकाँ अध्यक्ष सागर राऊत, सेतू देशमुख, अंकुश बनसोड, आशिष ताथोडे, अतुल अंबुलकर आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी बाजार समितीत ८०० क्विंटलची आवक झाली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

दर्यापुरात नाफेडच्या खरेदीला सुरुवात
दर्यापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाजार समितीच्या यार्डामध्ये नाफेडची नव्याने खरेदी सुरू करण्यात आली आहे. १५ मेपर्यंत बाजार समितीमध्ये १२ हजार ८९१ क्विंटलची आवक झालेली आहे. सोमवारपासून नव्याने तूर खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती बाबासाहेब बरवट, उपसभापती न.प्र. ब्राह्मणकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मधूभाऊ तराळ, मापारी हमाल संघाचे सदरोद्दीन शमशोद्दिन यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: For the first time, Nafed's center has started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.