पहिल्यांदाच अहिंसक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:41 AM2018-01-05T01:41:05+5:302018-01-05T01:41:28+5:30

कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुरोगामी विचाराच्या संघटनांनी अमरावती जिल्हा बंदची हाक दिली, व या हाकेला आंबेडकरी जनतेने भरभरून प्रतिसाद दिला, विशेष म्हणजे कोणतीही अहिंसक घटना न होता आंदोलन यशस्वी केले.

For the first time non-violent movement | पहिल्यांदाच अहिंसक आंदोलन

पहिल्यांदाच अहिंसक आंदोलन

Next
ठळक मुद्देआयोजकांचा पत्रपरिषदेत दावा : बंद दुकाने फुटणार कशी?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुरोगामी विचाराच्या संघटनांनी अमरावती जिल्हा बंदची हाक दिली, व या हाकेला आंबेडकरी जनतेने भरभरून प्रतिसाद दिला, विशेष म्हणजे कोणतीही अहिंसक घटना न होता आंदोलन यशस्वी केले. बंदच्या आयोजकांनी याबाबत गुरूवारी आयोजित पत्रपरिषदेत तमाम आंबेडकरी जनतेचे आभार मानले.
आंदोलन काळात सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याने, ही दुकाने फुटणार कशी, असा सवाल आयोजकांनी केला. बंददरम्यान काही कडव्या विचार सरणीच्या लोकांनी हिंसक वळण देण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही निषेध करतो, असे आयोजकांनी सांगितले. बंदला संभाजी ब्रिगेड व अन्य पुरोगामी विचारांच्या संघटनांचे सहकार्य लाभले. अमरावती चेंबर आॅफ कॉमर्स यांनी आंबेडकरी जनतेच्या भावना समजवून घेऊन सर्व प्रतिष्ठाने बंद केली, याबाबत आयोजकांनी सर्वांचे आभार मानले. भविष्यातदेखील आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेऊ, असे त्यांनी सांगितले. १ जानेवारीला वढू बु. येथे हिंसक दंगल करून दलित बांधवांना मारहाण करून दंगल घडवून आणणाºया घटनेचे मुख्य सूत्रधार मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे व घुगे यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली.

Web Title: For the first time non-violent movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.